मोहोळ : दलित वस्तीसाठी मिळालेला निधी बाजार समितीच्या रस्त्यासाठी खर्च

नगरपरिषदेच्या माध्यमातून दलित वस्ती साठी मंजूर करण्यात आलेली कामे व निधी इतरत्र वापरला जातो आहे
Mohol
MoholSakal
Updated on

मोहोळ : दलित वस्ती मधील पायाभूत व मूलभूत सुविधांसाठी मर्यादीत स्वरूपाचा निधी शासनाकडून मिळत आहे, तरी ही मोहोळ नगरपरिषदेकडून हा दलित वस्तीसाठी मिळालेला निधी दलित वस्तीसाठी न वापरता येथील बाजार समितीच्या रस्त्यासाठी खर्च केला जात आहे. तात्काळ ते काम बंद करावे अन्यथा नगरपरिषदेवर मोर्चा काढला जाईल याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासक तथा प्रांताधिकारी गजानन गुरव व मुख्याधिकारी डॉ.योगेश डोके व बांधकाम अभियंता गणेश बागल यांची राहील अशी माहीती भीम युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.विनोद कांबळे यांनी आयोजीत पत्रकार परिसदेत दिली.

नगरपरिषदेच्या माध्यमातून दलित वस्ती साठी मंजूर करण्यात आलेली कामे व निधी इतरत्र वापरला जातो आहे. याची माहिती देण्यासाठी अॅड विनोद कांबळे , रियाज शेख ,मंगेश पांढरे ,संतोष सोलनकर ,धनराज पडवळकर ,राजन घाडगे ,नागेश बिराजदार व बाबुराव ढाणके या सामाजिक कार्यकर्त्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद आयोजीत केली होती.

मोहोळ शहरातील मुख्य रस्ता लोकनेते चौक ते राष्ट्रीय महामार्ग इथपर्यंत चा 24 लाख 97 हजार 940 रुपये मंजूर झालेला काँक्रीट रस्ता हा पूर्णपणे मार्केट कमेटी च्या जागेतून केला जात आहे.वास्तविक पाहता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ता 3 मार्च 2021 रोजी जो वरील कामाचा प्रशासकीय मंजुरी आदेश दिला आहे.या आदेशात ज्या अटी व शर्ती घातलेल्या आहेत त्यात क्रमांक एकची अटच अशी आहे की, प्रस्तावातील मंजूर करण्यात आलेली कामे चालू करण्यापूर्वी नगरपरिषदेने सदरची कामे अनुसूचित जाती(नवबौद्ध)विशेष घटक यांची लोकसंख्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आहे,सदरची जागा नगरपरिषदेच्या ताब्यात असल्याची खात्री करूनच कामे करण्याची कार्यवाही करावी .यात विसंगती आढळल्यास सर्वस्वी मुख्याधिकारी जबाबदार असतील असे नमूद केले असतानाही या खाजगी जागेत दलीतवस्ती चा निधी कसा काय खर्च केला जाऊ शकतो ..? असा सवाल उपस्थीत करीत या ठिकाणी एकही दलित राहत नसून मंजूर काम वेगळ्या वार्डातील आहे.आणि प्रत्यक्षात काम वेगळ्याच वार्डात केले जात आहे.त्यामुळे ही मोहोळ करांच्या डोळ्यात धूळफेक असून दलितांवर अन्याय आहे.

सद्यस्थितीत नगरपरिषदेने हे काम तात्काळ बंद करावे.व दलित वस्ती ज्या ठिकाणी आहे.ज्या ठिकाणी खरंच नागरिकांना रस्त्याची आवश्यकता आहे. अश्या ठिकाणी हा रस्ता झाला पाहिजे इथं बाजार समिती गाळ्यांच्या माध्यमातून लाखो रुपये कर वसूल करीत आहे.त्यामुळे या ठिकाणी सुखसोयी देण्याची जबाबदारी ही बाजार समितीची शहरवासीयांना फसवून दलित वस्तीचा निधी मार्केट कमेटी च्या कामांसाठी वापरू नये . जर नगरपरिषदेने हे काम तात्काळ बंद नाही केले तर आम्ही या विरोधात मोर्चा चे आयोजन करणार असुन याची संपूर्ण जबाबदारी प्रशासक गजानन गुरव , मुख्याधिकारी डॉ.योगेश डोके व बांधकाम अभियंता गणेश बागल यांची राहील याचा पुनरुच्चार अॅड .विनोद कांबळे यांनी केला .

"काम बंद केले आहे , चौकशी समिती नेमली जाईल "

प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमण्यात येईल त्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्या नंतरच पुढील कारवाई करण्यात येईल.दरम्यान ते काम बंद ठेवण्यात आलेले आहे.

डॉ. योगेश डोके ( मुख्याधिकारी मोहोळ नगरपरिषद )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.