तापमान, ऑक्सिजन, रक्तदाब मॉनिटरींग करा ‘ऑप्टिईपॅड’मधून

आरोग्यावर लक्ष ठेवा आता एकाच उपकरणात !
Monitor temperature, oxygen, blood pressure from OptiPad
Monitor temperature, oxygen, blood pressure from OptiPad
Updated on
Summary

एसटीपीचे ‘फोर इन वन’ ‘ऑप्टिईपॅड’ अल्पावधतीच नागरिकांना उपलब्ध होणार

पुणे : कोरोनाच्या काळात पल्स रेट ऑक्सिमीटर, थर्मल गन, बीपी मॉनिटर या वैद्यकीय उपकरणांनी आता घराघरात स्थान पटकावले आहे. पण वेगवेगळी उपकरणे सांभाळण्यापेक्षा एकाच उपकरणात या चारही सुविधा आल्या तर ही किमया शक्य झाली आहे अन साध्य केली आहे ती शहरातील सायन्स अॅड टेक्नॉलॉजी पार्कने (एसटीपी). ‘फोर इन वन’ सुविधा असलेले ‘ऑप्टिईपॅड’ हे उपकरण नागरिकांना अल्पावधीतच किफायतशीर दरात उपलब्ध होणार आहे.

Monitor temperature, oxygen, blood pressure from OptiPad
पुणेकरांच्या सावलीने सोडली साथ, मुंबईत शून्यसावली दिवस कधी?

शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजणे, नाडीचे ठोके तपासणे, शरीरारातील तापमानाची नोंद ठेवणे, रक्तदाबावर लक्ष ठेवणे आदींसाठी आता वैद्यकीय उपकरणांची गरज नागरिकांना भासू लागली आहे. सदृढ आरोग्याचे हे ‘इंडिकेटर’ असल्यामुळे ही उपकरणे आता घराघरात पोचली आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी नागरिकांना वेगवेगळी उपकरणे हाताळावी लागतात. त्यात पैसेही जास्त लागतात. त्यातच पल्स, ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर, थर्मल गन यासाठीची उपकरणे बाजारपेठेत सध्या प्रामुख्याने चीनी बनावटीची आहेत. त्यांचा दर्जा आणि अचूकताही अनेकदा कळीचा मुद्दा असते. ही बाब लक्षात घेऊन ‘एसटीपी़चे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी सध्याच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी ‘फोर इन वन’ सुविधा असलेल्या या उपकरणाची संकल्पना मांडली.

Monitor temperature, oxygen, blood pressure from OptiPad
पुण्यात पशु पक्ष्यांसाठी धावले प्राणीमित्र

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेल्या ‘एसटीपी’ने केंद्र सरकारच्या निधी प्रयास व निधी सीड योजनेतून पाठबळ दिल्यामुळे ‘वोल्ट पॉवर ट्रॉनिक्स’ या स्टार्टअपने हे उपकरण तयार केले आहे. त्याच्या रुग्णांवरील वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच काही डॉक्टरही रुग्णांसाठी त्याचा सध्या वापर करीत आहेत. महिनाभरात या उपकरणाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होणार आहे. काही औषध निर्माण कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि औषध विक्रेत्या संघटनांनीही या उत्पादनात स्वारस्य दाखविले आहे. सध्या चारही उपकरणांसाठी नागरिकांना किमान ७ ते ८ हजार रुपये खर्च येतो. परंतु, ‘एसटीपी’ मार्फत तयार झालेले हे फोर इन वन उपकरण नागरिकांना सुमारे ५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध होणार आहे.

''कोरोना अन साथीच्या आजारांमुळे नागरिकांमध्ये आरोग्याबद्दलची जागरूकता कमालीची वाढली आहे. त्यासाठी विविध वैद्यकीय उपकरणांची दैनंदिन जीवनात गरज भासत आहे. हे लक्षात घेऊन ऑप्टिईपॅड हे फोर इन वन उपकरण तयार केले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे उत्पादन असून त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल. ''

- डॉ. राजेंद्र जगदाळे (महासंचालक, एसटीपी)

Monitor temperature, oxygen, blood pressure from OptiPad
पुण्यातील रिक्षाचालकांची 'जुगाड ऍम्ब्युलन्स' धावतेय मदतीसाठी

फोर इन वन उपकरणाची वैशिष्ट्ये

  • दर्जेदार सुट्या भागांचा वापर

  • सहज सोबत बाळगता येणारे छोटे उपकरण

  • उपकरणतील बॅटरीचे किमान दिड वर्षे आयुर्मान

  • अचूक आणि ताबडतोब निदान

  • वाय-फायला कनेक्ट करून संगणकावरूनही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.