Monsoon : पाऊस वीकेंडला परतणार; घाटमाथ्यावर पुढील चार दिवस‘ऑरेंज अलर्ट’

पुणे शहराच्या परिसरातील घाटमाथ्यावर काही भागांत येत्या शुक्रवारपासून (ता. १२) पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडेल. त्यासाठी हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
rain
Rainesakal
Updated on

पुणे - शहराच्या परिसरातील घाटमाथ्यावर काही भागांत येत्या शुक्रवारपासून (ता. १२) पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडेल. त्यासाठी हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी पावसाचा आनंद घेण्यासाठी घाटमाथ्यावर जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

पुणे शहरात मंगळवारपासून (ता. ९) पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाची एखादी सर हजेरी लावत आहे. शिवाजीनगर येथे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत फक्त ०.७ मिलिमीटर पाऊस नोंदला. शहरात १ जून ते ११ जुलै या दरम्यान २८९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या दरम्यान शिवाजीनगरमध्ये सरासरी २२४ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत सरासरीपेक्षा ६५.९ मिलिमीटर जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे पाण्याची टांगती तलवार असलेल्या पुणेकरांचे पावसाकडे डोळे लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर हवामान खात्याने पुढील चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.

मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण

राज्यात नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) पुन्हा सक्रिय होईल, यासाठी पोषक हवामान होत आहे. त्यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. येत्या शुक्रवारपासून (ता. १२) तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

हवामानाची सद्यःस्थिती

मॉन्सून आता सर्वसाधारण स्थितीवर पोहचला असून, हा कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून जयपूर, ओराई, बलिया, असनसोल, बागती ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात परस्पर विरोधी वाहणाऱ्या पूर्व-पश्‍चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय झाले आहे.

अतिजोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

राज्याच्या बहुतांश भागांत पावसाची उघडीप

पुण्यासह सातारा, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना येत्या शुक्रवारी (ता. १२) मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नाशिक, पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मुंबई आणि मुंबई उपनगर येथे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे तेथे ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तेथेही वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ खात्याने दिला आहे. मात्र, राज्यातील उर्वरित बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.