केरळमध्ये लवकरच मॉन्सूनच्या सरी पडतील

श्रीलंकेत गेल्या पाच दिवसांपासून मुक्काम ठोकलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
Monsoon
MonsoonSakal
Updated on

पुणे - श्रीलंकेत (Srilanka) गेल्या पाच दिवसांपासून मुक्काम ठोकलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) (Monsoon) पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण (Environment) तयार झाले आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी (ता. ३) मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याने मंगळवारी दिले. (Monsoon Showers will Fall in Kerala Soon)

श्रीलंका व मालदीव, कोमोरीन भागांपर्यंत मजल मारलेल्या मॉन्सूनचा प्रवास रखडला होता. मात्र, अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती निवळल्याने पुन्हा मॉन्सूनच्या प्रवासासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे केरळमध्ये लवकरच मॉन्सूनच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Monsoon
पुण्यात शिल्लक ऑक्सिजनही उद्योगांना मिळेना!

अंदमान बेटांवर २१ मे रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनचा प्रवास सुरू आहे. गेल्या ११ दिवसांत मॉन्सूनने जवळपास श्रीलंकेपर्यंत मजल मारली. त्यानंतर प्रवासात अडथळा निर्माण झाल्याने प्रवास लांबला आहे. सध्या अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग व कर्नाटक किनारपट्टी दरम्यान चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तसेच मध्य प्रदेशाच्या वायव्य भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे मॉन्सूनचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.