अभिमानश्री सोसायटी इथे दोन मोठी झाडे मुळापासून उन्मळून दोन वाहनांचे मोठे नुकसान

पाषाण- बाणेर रस्ता येथील अभिमानश्री सोसायटी जवळ पावसामुळे दोन झाडे मुळापासून उन्मळून पडली, यावेळी दोन चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले
monsoon weather update Abhimanshree Society Two large trees uprooted major damage to two vehicles pune
monsoon weather update Abhimanshree Society Two large trees uprooted major damage to two vehicles pune sakal
Updated on

बालेवाडी : पाषाण- बाणेर रस्ता येथील अभिमानश्री सोसायटी जवळ पावसामुळे दोन झाडे मुळापासून उन्मळून पडली, यावेळी दोन चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले . ही दोन्ही वाहने पुण्याहून मुंबईला जात असताना हा अपघात घडला .अग्निशमन केंद्र व उद्यान विभागाच्या मदतीमुळे अपघातग्रस्तांना त्वरित वाहनांतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. यामध्ये सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही . पुणे शहरात चार पाच दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे .यामुळे पाषाण - बाणेर रस्ता अभिमानश्री सोसायटी गेट नंबर 3 समोर (ता. 10. जुलै ) रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान रस्त्याच्या मधोमध असलेली दोन मोठी झाडे मुळापासून उन्मळून पडली .सध्या संपूर्ण बाणेर रस्ता येथे मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.

यासाठी सध्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून बाणेरला जाण्यासाठी अभिमानश्री सोसायटी मार्गे ही वाहतूक बाणेर कडे वळविण्यात आली आहे. त्यामुळे संध्याकाळी चारच्या दरम्यान या ठिकाणाहून बाणेर मार्गे मुंबई बंगलूर मार्गे मुंबईला जाणाऱ्या दोन चारचाकी वाहनांवर ही झाडे कोसळली. यामध्ये. MH01 AC 8607 या होंडा सिविक या चारचाकी वाहनावर मागच्या बाजूला झाड कोसळल्याने गाडीच्या मागच्या काचा फुटल्या तर दुसरी MH 02 CR 3659 या इनोवा कार च्या पुढच्या बाजूला झाडाच्या फांद्या पडल्याने या गाडीचे पुढच्या बाजूचे नुकसान झाले. दोन्ही वाहने झाडाखाली अडकली होती , यामध्ये प्रवासी पण होते ,सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही अशी माहिती अग्निशमन केंद्राचे स्टेशन अधिकारी शिवाजी मेमाने यांनी दिली. अपघाताची माहिती समजताच पाषाण अग्निशमन केंद्र ,उद्यान विभाग यांच्या मदतीने पडलेली झाडे तोडून झाडाखाली अडकलेली दोन्ही वाहने बाहेर काढण्यात आली. सदर वर्दीवर पाषाण अग्निशमन केंद्राचे स्टेशन ऑफिसर शिवाजी मेमाने, फायरमन जवान बालराज संगम ,गजानन बालगरे, रोहित पुष्कराज, चालक युवराज जाधव यांनी कामगिरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.