पुण्यातल्या चोरट्या दाजी-मेहुण्याला सासवडमध्ये अटक; चोरीसाठी बहीण करायची मदत

more than 19 Case filed against Two arrested in Saswad
more than 19 Case filed against Two arrested in Saswad
Updated on

लोणी काळभोर (पुणे) : जिल्ह्य़ाच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दाजी व मेहुण्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (ग्रामीण ) पोलिसांनी सासवड परिसरातून गुरुवारी (ता. 9) मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे या चोरीत आरोपीची बहीण हीच सहकार्य करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजय राजू अवचिते (वय- २७ ), गणेश उर्फ ठोम्या गौतम भोसले (वय- २७) (रा. दोघेही आलेगाव पागा, ता. शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींच्याकडून सोने- चांदीच्या दागिन्यांसह साडेपाच लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवरी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीतील सोपान मारुती भिसे (वय- ५० ) यांच्या घराचे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून साडे चौदा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख ९० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. त्याबाबत सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेअंर्तगत करण्याच्या सूचना पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या. त्यानुसार घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस हवालदार चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, पोलीस नाईक गुरु गायकवाड, सागर चंद्रशेखर काशिनाथ राजापुरे, यांचे पथक तयार करण्यात आले होते.
 
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सदर गुन्ह्याचा तपास घटनास्थळी जाऊन सुरू केला. त्यावेळी तेथील सीसीटीव्ही फुटेजद्वारे सदरचा गुन्हा हा अवचिते याने केला असल्याची खात्रीपूर्वक माहिती एका खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अवचिते राहत असलेल्या ढवळगाव तसेच बारामती, पुरंदर, सासवड, लोहियानागर, पुणे, चिंचवड, घोरपडी, कोरेगाव पार्क, या ठिकाणी जाऊन शोध घेतला परंतु तो हाती लागला नाही. दरम्यान, अवचिते व त्याचा साथीदार सासवड (ता. पुरंदर) या ठिकाणी येणार असल्याची खात्रीदायक माहिती एका खबऱ्यामार्फत गुन्हे शाखेतील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून व वेषांतर करून दोघांना ताब्यात घेण्यात आले.

सदर आरोपींकडे चौकशी केली असता, अवचिते याचा साथीदार असलेला गणेश हा त्याचाच मेव्हना असल्याचे समजले. अवचिते, गणेश भोसले, पत्नी सीमा असे तिघे मिळून घरफोड्या, चोऱ्या करण्यासाठी जात असत. सीमा फक्त येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवायचे काम करीत असे. आतापर्यंत तिघांनी मिळून दौंड, कोडीत, भिवरी, सासवड, जयदीप कार्यालयाजवळील म्हाडा कॉलनी, कोंडवाडा, किरकटवाडी, भिगवन, बोरिपारधी, नगर रोड एल अँड टी फाटा, गॅस गोडाऊनच्या जवळ या सर्व ठिकाणी चोरी केल्या आहेत. दरम्यान, बजरंग वाडी येथे चोरी करताना लोक जागे झाले म्हणून पळून गेल्याची त्यांनी सांगितले.

दरम्यान, सदर आरोपींकडून घरफोडी व चोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून १३ तोळे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ९ तोळे ४ ग्रॅम चांदीचे दागिने, व एक गॅस सिलेंडर असा एकूण ५ लाख ३७ हजार, सहाशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून यांच्यावर हडपसर, लोणी काळभोर, जेजुरी, बारामती शहर,  बारामती तालुका, सासवड, भिगवण, खेड, शिरूर, या पोलीस स्टेशनला खुणांसह दरोडा जबरी चोरी, घरफोडी, असे एकूण १९ गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.