विवाह सोहळ्यात मिरवलेल्या २२ जणांचा कोरोनाने वाजवला बॅंड

corona logo1.jpg
corona logo1.jpg
Updated on

वाघोली (पुणे) : वाघोलीतील एकाच कुटुंबातील तब्बल 22 पेक्षा अधिक जण आज कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हा परिसर तातडीने सील करण्यात आला. या कुटुंबातील एकाचा नुकताच विवाह सोहळा पार पडला.
आठवड्यापूर्वी पिंपरी चिंचवड परिसरात हा विवाह सोहळा पार पडला.

या कुटुंबातील एका व्यक्तीला काही लक्षणे आढळून आल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. ते पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सर्व कुटुंबियांची चाचणी करण्यात आली. यामध्ये 22 पेक्षा अधिक जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यातील काही चाचणीचे अहवाल येणे बाकी आहेत. ही माहिती मिळताच ग्रामपंचयातीने तातडीने या परिसरातील सर्व दुकाने बंद करून हा परिसर सील केला. त्या परिसरात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून फलकही लावण्यात आला आहे.

सध्या वाघोलीत सरासरी 15 ते 20 रुग्ण आढळून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी 42 रुग्ण आढळून आले होते. तर काल दिवसभरात 35 व आजही 35 रुग्ण आढळुन आले. मात्र, 73 रुग्ण काल एकाच दिवशी बरे झाले. तर आज 3 रुग्ण बरे झाले. वाघोलीतील रुग्णांची संख्या 887 झाली असून 204 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 680 जणांनी कोरोना वर मात केली आहे. वाघोलीतील रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने उद्या ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याचे ग्रामपंचायत सदस्य शिवदास उबाळे यांनी सांगितले. 

लग्न, दशक्रिया विधी व अन्य कार्यक्रम सध्या सुरू आहेत. यामुळे नागरिक, कुटुंब एकत्रित येत असल्याने रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. वाढदिवस, अभिनंदन यासारखे कार्यक्रमही होत आहेत. यामध्ये काही प्रमाणात नियम पाळले जात नाहीत. परिणामतः संसर्ग वाढतो. संसर्ग कमी करण्यासाठी असे कार्यक्रम अगदी साधे व घरातच होणे गरजेचे असून तेथेही काटेकोर पणे नियम पाळले पाहिजे.
- डॉ वर्षा गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली. 

 

रुग्ण वाढू लागल्याने वाघोली सात दिवस बंद ठेवण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, केवळ दुकाने बंद झाली म्हणजे संसर्ग थांबला असे होत नाही. व्यापारी आधीच मेटाकुटीला आले आहेत. पूर्वी पेक्षा 50 टक्के व्यवसायात घट झाली आहे. आता पुन्हा बंद म्हणजे व्यापाऱ्यांची अवस्थाही मरणासन्न होईल. त्यामुळे असा निर्णय घेताना काळजी पूर्वक विचार करावा.

- एक व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.