पुणे : ग्रामीण भागात वाढतोय कोरोना; 113 गावांत हाय अलर्ट

पुणे : ग्रामीण भागात वाढतोय कोरोना; 113 गावांत हाय अलर्ट
Updated on

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड(pune Pimpri Chinchwad) शहरातील नवीन कोरोना (Corona Positive)रुग्णांची रोजची आकडेवारी कमी होत असली तरी जिल्ह्याच्या ग्रामीण (Rural Area) भागात मात्र याउलट चित्र आहे. मागील आठ दिवसांपासून ग्रामीण भागातील रोजच्या नवीन रुग्णांची(Patients) संख्या सातत्याने वाढून लागली आहे. ग्रामीणमध्ये दररोज सरासरी ३ हजार १० नवे रुग्ण सापडू लागले आहेत. यामुळे जिल्ह्यात(Pune District) फक्त आठ दिवसांत २४ हजार ८७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याउलट कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण शहराच्या तुलनेने कमी आहे. यावरून कोरोनाने आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (More patients are found in rural areas of Pune than in cities from Last 8 days)

पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या पहिल्या लाटेत उलटे चित्र होते. पहिल्या लाटेत शहर व पिंपरी चिंचवडमधील रोजच्या रुग्णांची संख्या ग्रामीण भागाच्या तुलनेत खूप मोठी असायची. सध्याच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेच्या बरोबर उलटे चित्र निर्माण झाले आहे. दुसऱ्या लाटेत शहरांतील रोजच्या रुग्णांची संख्या ग्रामीण भागातील रुग्णांच्या तुलनेत खुपच कमी असल्याचे दिसून आले आहे.

आजघडीला ग्रामीण भागात दररोज सरासरी २ हजार ४१२ रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. यावरून रोजच्या सरासरी नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५९८ ने कमी आहे. पुणे शहरालगत असलेल्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये हाय ॲलर्ट लागू करण्यात आला आहे. ग्रामीण भागात ४ ते ११ मे या आठ दिवसांत मोठ्या संख्येने रुग्ण वाढले आहेत. यामुळे आठ दिवसांतील सक्रिय रुग्णांची संख्या २५ हजारांच्या घरात पोचली आहे. शिवाय केवळ आठ दिवसांत २३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रोज सरासरी ३० रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे.

पुणे : ग्रामीण भागात वाढतोय कोरोना; 113 गावांत हाय अलर्ट
कोरोनाबाधित मृतांवर 'उम्मत' करतेय मोफत अंत्यसंस्कार

‘ग्रामीण’मधील आठ दिवसांची आकडेवारी

- तारीख --- नवे रुग्ण --- कोरोनामुक्त --- मृत्यू

- ११ मे --- ३१५६ --- २६६४ --- ३९

- १० मे --- १९४० --- २५४३ --- ३१

- ९ मे --- २८५० --- ३०२० --- २२

- ८ मे --- ३५२६ --- २४५९ --- २४

- ७ मे --- ३६६० --- २२७६ --- ३५

- ६ मे --- ३२७० --- १६७८ --- ३०

- ५ मे --- २९९४ --- २३११ --- ३३

- ४ मे --- २६९१ --- २३४९ --- २२

पुणे : ग्रामीण भागात वाढतोय कोरोना; 113 गावांत हाय अलर्ट
Sakal Impact : किरकटवाडी येथे पोलिस बंदोबस्तात लसीकरण

- एकूण --- २४०८७ --- १९३०० --- २३६

(टीप : यामध्ये नगरपालिका व कॅंटोन्मेंट हद्दीतील रुग्णांचा समावेश नाही.)

रुग्णवाढीची प्रमुख कारणे

- चाचण्यांची संख्या वाढविली

- रुग्णांच्या संपर्कांतील सर्वांची कोरोना चाचणी घेणे

- सुपर स्प्रेडर्सचे सर्वेक्षण व चाचणी घेणे अनिवार्य

- लक्षणेविरहित रुग्णांचे प्रमाण अधिक

प्रतिबंधात्मक उपाययोजना

- ११३ गावांत हाय ॲलर्ट जाहीर

- हाय ॲलर्ट गावांमध्ये प्रत्येकी एक स्वतंत्र अलगीकरण कक्ष

- गावाबाहेर पडणाऱ्या व्यक्तींना अलगीकरण कक्षात राहणे बंधनकारक.

- शहरात दूध विक्रीसाठी जाणाऱ्यांना अलगीकरण कक्षात राहणे अनिवार्य

- घरातही सामाजिक अंतर पाळणे अनिवार्य

पुणे शहराच्या तुलनेत जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात नवीन कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी स्थिर ठेवण्यात यश आलेले आहे. प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सर्वेक्षण आणि चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने ही संख्या दिसते आहे. उपचारासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून न जाता, नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

- आयुष प्रसाद,

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.