Pune News : सरकारी तिजोरीत ४७ हजार कोटी ; मुद्रांक शुल्क विभागाला गतवर्षीपेक्षा अधिक महसूल

दस्तनोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला चालू आर्थिक वर्षात (२०२३-२४) आतापर्यंत ४७ हजार ४३८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. गतवर्षीच्या (२०२२-२३) तुलनेत दोन हजार ७५७ कोटी रुपयांनी अधिक महसूल मिळाला आहे.
Pune News
Pune Newssakal
Updated on

पुणे : दस्तनोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला चालू आर्थिक वर्षात (२०२३-२४) आतापर्यंत ४७ हजार ४३८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. गतवर्षीच्या (२०२२-२३) तुलनेत दोन हजार ७५७ कोटी रुपयांनी अधिक महसूल मिळाला आहे.

गतवर्षी दस्तनोंदणीतून राज्य सरकारला ४४ हजार ६८१ कोटींचा महसूल मिळाला होता. नोंदणी विभागाला यंदा शासनाने ५० हजार कोटींचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यास अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. आतापर्यंत ४७ हजार ४३८ कोटींचा महसूल जमा झाला आहे. येत्या पाच दिवसांत नोंदणी विभाग ५० हजार कोटींचा टप्पा पार करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Pune News
Pune Water Problem : पुण्याला दोन महिने पुरेल इतकेच पाणी ; धरणसाठ्यात घट

राज्याला महसूल मिळवून देणारा ‘नोंदणी व मुद्रांक शुल्क’ हा दुसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. राज्यातील शहरांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. शहरांच्या हद्दीलगतच्या गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर नागरिकरण होत आहे. यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती वा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार, शेअर बाजार अशा विविध होणाऱ्या करांच्या नोंदणीतून नोंदणी विभागाकडे कर जमा होतो

दस्तनोंदणीतून मिळालेला महसूल

आर्थिक वर्ष दस्त संख्या जमा महसूल

२०२१-२२ २३,८३,७१२ ३५,१७१ कोटी

२०२२-२३ २५,७६,५३६ ४४,६८१ कोटी

२०२३-२४ २७,५९,०९८ ४७,४३८ कोटी (२५ मार्चअखेर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.