अमेरिकेतल्या इंजिनीअर तरुणीनं पुण्यात दान केलं मातृदूध

mother
mother
Updated on

पुणे - ‘ती’ मूळची अमेरिकेतील. व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर. कंपनीच्या कामानिमित्त ती दहा दिवसांसाठी पुण्यात आलेली. यादरम्यान ‘तिनं’ ससून रुग्णालयात सात लिटर मातृदूध दान करून पुण्याशी ‘मातृत्वाचं नातं’ जोडलं.

अमेरिकेतील सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता म्हणून काम करणारी ती एका प्रकल्पाच्या कामानिमित्त अमेरिकेहून पुण्यात आली होती. तिला पंधरा महिन्यांचे बाळ आहे. तिची ही दुसरी प्रसूती होती. या आठ-दहा दिवसांच्या दरम्यान तिच्या मातृदुधाचा वापर करण्याचा निश्‍चय तिने पुण्यात येण्याच्या आधीच केला होता. त्यादृष्टीने तिने इंटरनेटवरून माहितीही घेतली होती. ही माहिती शोधताना तिला ससून रुग्णालयातील मातृदुग्ध पेढीचा संदर्भ मिळाला. या मातृदुग्ध पेढीला दोन वर्षांपूर्वी ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’तर्फे (बीएमजे) ‘मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ टीम ऑफ द इअर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले होते, अशी माहितीही इंटरनेटवरून मिळाली. त्यामुळे अमेरिकेतून ‘टेक ऑफ’ करण्यापूर्वीच ई-मेलवरून तिने ससून रुग्णालयाशी संपर्क साधून मातृदूध दानाची चौकशी केली. त्यानंतर पुण्यात आल्यानंतर ७ ते १६ नोव्हेंबर या दहा दिवसांमध्ये तिने आपले सात लिटर दूध ससून रुग्णालयातील दुग्धपेढीत दिले. हे दूध रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या बालकांना देण्यात आले, असे रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यासाठी दुधाच्या सर्व अत्यावश्‍यक चाचण्या करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बालरोग विभागप्रमुख डॉ. आरती किणीकर आणि प्रा. डॉ. छाया वळवी यांनी मातृदुधाच्या संकलनाची प्रक्रिया केली.

याबाबत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ‘‘दुग्धदानाची चळवळ निर्माण व्हावी, यासाठी ससून रुग्णालय सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यातून रुग्णालयात आलेल्या अनाथ बालकांना मातेचे दूध मिळते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.