परिवहन खात्याकडूनच मराठीची उपेक्षा !

मराठी ही राजभाषा असली तरी, राज्य सरकारचे परिवहन खाते त्यापासून अनभिज्ञ आहे की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Motor Vehicle Department
Motor Vehicle DepartmentSakal
Updated on

पुणे - मराठी (Marathi) ही राजभाषा असली तरी, राज्य सरकारचे (State Government) परिवहन खाते (Motor Vehicle Department) त्यापासून अनभिज्ञ आहे की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शिकाऊ परवान्याची ऑनलाइन परीक्षा (Online Exam) उत्तीर्ण होण्यासाठी जो ‘व्हिडिओ’ (Video) पाहायचा आहे, तो फक्त इंग्रजी (English) आणि हिंदी भाषेतच (Hindi Language) आहे. परवाना काढणारे राज्यातील ९५ टक्के उमेदवार हे मराठी भाषिक आहेत. परंतु, मराठीत परीक्षेचा व्हिडिओ नसल्यामुळे अनेक उमेदवारांचा हिरमोड होत आहे. (Motor Vehicle Department Marathi Language Issue)

राज्य सरकारने १४ मेपासून शिकाऊ परवान्यासाठी ऑनलाइन परीक्षा सुरू केली आहे. उमेदवारांनी त्यांची कागदपत्रे परिवहन वेबसाइटवर सारथी विभागात अपलोड केल्यावर त्यांना एक व्हिडिओ पाहून परीक्षा द्यायची आहे. त्या परीक्षेत १५ पैकी ९ गुण मिळाल्यावर संबंधित उमेदवार उत्तीर्ण होणार आहे. मात्र, परीक्षा देण्यासाठी जो व्हिडिओ पाहायचा आहे, तो फक्त इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे. इंग्रजीतील व्हिडिओ सुमारे १२ मिनिटांचा तर, हिंदी भाषेतील व्हिडिओ सुमारे ८ मिनिटांचा आहे. इंग्रजीतील व्हिडिओ विस्तृत स्वरूपाचा आहे तर, हिंदीतील व्हिडिओ तुलनेने कमी माहिती देणारा आहे, असा उमेदवारांचा आरोप आहे. ज्या उमेदवारांना इंग्रजी आणि हिंदी भाषेतील व्हिडिओची अडचण आहे, त्यांना मराठीतील व्हिडिओ उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना एजंटांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे राज्याच्या परिवहन विभागानेही मराठी भाषेत व्हिडिओ उपलब्ध करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Motor Vehicle Department
मुक्त विद्यालयातील पाचवी आणि आठवीचा निकाल 28 जूनला

इंग्रजी आणि हिंदी भाषेतील व्हिडिओ अवघड आहे. त्यामुळे परीक्षा देताना मला एजंटची मदत घ्यावी लागली. अन् त्यासाठी त्याला पैसेही द्यावे लागले. व्हिडिओ जर मराठी भाषेत असेल तर, परीक्षा देणे सोपे जाईल. त्यामुळे राज्य सरकारने या बाबत तातडीने निर्णय घ्यावा.

- एक उमेदवार

शिक्षित उमेदवार इंग्रजी आणि हिंदी भाषेतील व्हिडिओ पाहून परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊ शकतात. परंतु, कमी शिकलेल्या उमेदवारांना भाषेची अडचण येत आहे. मराठीत व्हिडिओ उपलब्ध करणे राज्य सरकारला शक्य आहे.

- विठ्ठल मेहता, ड्रायव्हिंग स्कूल ओनर

मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा आहे. त्याचा शासकीय आदेशही आहे. मात्र, शासकीय कारभारात मराठीची हेळसांड सहन केली जाणार नाही. शिकाऊ परवान्याचा व्हिडिओ मराठी भाषेत उपलब्ध व्हायला हवाच.

- रवी सहाने, मनसे, शहर सचिव

व्हिडिओ मराठीत हवा, अशा सूचना नागरिकांनी आमच्याकडे केल्या आहेत. त्या परिवहन आयुक्त कार्यालयाला कळविल्या आहेत. लवकरच या बाबत निर्णय अपेक्षित आहे.

- अजित शिंदे, पुणे आरटीओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.