खा. कोल्हे कर्नाटकातील होदीगेरे येथील शहाजीराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक

समाधी स्मारकाच्या विकासासाठी निधीची केली मागणी
Amol Kolhe
Amol KolheSakal
Updated on

कोरेगाव भीमा : स्वराज्य संकल्पक महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांची कर्नाटकातील होदीगेरे येथील समाधीस्थळ दुर्लक्षित अवस्थेत असल्याबाबत समाज माध्यमावरील पोस्टची दखल घेत आज शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी होदीगेरे येथील या समाधीस्थळी नतमस्तक होत या समाधी स्मारकाचा विकास आराखडा व विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही डॉ. कोल्हे यांनी दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केली.

गेल्या काही दिवसांपासून होदीगेरे येथील शहाजीराजे भोसले यांची समाधी दुर्लक्षित अवस्थेत असल्याची पोस्ट समाज माध्यमांवर फिरत होती. या पोस्टची तातडीने दखल घेत काल कागल येथील शिवजयंती उत्सवातील व्याख्यान संपल्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी शहाजीराजांच्या समाधी स्थळाला भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज कर्नाटकमधील दावणगिरी जिल्ह्यातील होदीगेरे येथील समाधीवर नतमस्तक होऊन स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, शहाजीराजे समाधी स्मारक समितीचे अध्यक्ष मल्लेश्वर शिंदे, प्रफुल्ल तावरे, डॉ. घन:श्याम राव, आदी सहकारी उपस्थित होते.

Amol Kolhe
श्रेय पंतप्रधान मोदींचेच, दुसरे कोणीही ते घेऊ नये - रावसाहेब दानवे

होदीगेरी परिसरात नरभक्षक वाघांनी आदिवासींवर हल्ला केल्याचे कळताच त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या शहाजीराजांचा २३ जानेवारी १६६४ रोजी अपघाती मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला तिथे छोट्याशा जागेत शहाजीराजांचे समाधी स्मारक उभारण्यात आले आहे. मात्र अतिशय छोट्या जागेत दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या या समाधी स्थळावर शहाजीराजांचे चांगले स्मारक उभे राहिल्यास नव्या पिढीला प्रेरणा मिळेल अशा भूमिकेतून खासदार डॉ. कोल्हे यांनी तातडीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र पाठवून स्मारकाचा विकास आराखडा तयार करून त्याच्या उभारणीसाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, स्वराज्याची संकल्पना मांडणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्रोत असलेले त्यांचे वडील महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांची समाधी दुर्लक्षित असणे हे अतिशय क्लेशदायक बाब आहे. खरं तरं छत्रपती शिवाजी महाराजांइतकेच शहाजीराजांचे कार्यही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे या समाधी स्मारकाचा नियोजनबद्ध विकास करुन एक भव्य स्मारक उभे राहणे आवश्यक आहे.

त्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही सरकारांकडे पाठपुरावा करणार असून भारतीय पुरातत्त्व विभागाललाही या स्मारकासाठी सहकार्य करण्याची विनंती करणार असल्याचे सांगून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, याखेरीज खासदार स्थानिक विकास निधीतून निधी उपलब्ध करुन देता येईल का याचीही चाचपणी करणार आहे. आवश्यकता भासल्यास आपण शिवप्रेमी जनतेच्या माध्यमातून निधी उभारणी करण्याचा प्रयत्न करु असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.