अन् खासदार अमोल कोल्हे राहिले चक्क रांगेत उभे, कारण...

अन् खासदार अमोल कोल्हे राहिले चक्क रांगेत उभे, कारण...
Updated on

पुणे : शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ती पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चिली जात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासदार कोल्हे यांनी मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात कोविड चाचणी करून घेतली आहे. त्यांना तेथे कसा अनुभव आला याबाबतचे वर्णन त्यांनी आपल्या फेसबुकर पोस्टमध्ये केले आहे. त्याचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. 

खासदार कोल्हे यांचे स्वीय सहाय्यक कोरोनाबाधित झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या संपर्कात असल्यामुळे स्वत:ची कोविड चाचणी करून घेतली. ती मुंबईमधील महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात. येथील असणार्‍या सोयी-सुविधांबाबत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये कौतुक केले आहे.

तसेच त्यांच्या कोविड चाचणीत सहभागी असणार्‍या डाॅक्टरांचे त्यांनी कौतुक केले. खासदार कोल्हे देखील पेशाने डाॅक्टर आहेत. त्यामुळे डाॅक्टरांना कुठल्या समस्यांचा सामना करावा लागतो हे त्यांना चांगलेच माहिती आहे. यावेळी कोल्हे यांनी कोरोनाच्या या लढाईत मास्क, व्हेंटिलेटर, आस्थापना याबरोबरच कुशल मनुष्यबळ देखील तेवढंच महत्वाचं हे पुन्हा अधोरेखित झालं, असल्याचे सांगितले.

कोल्हे यांनी विषद केलेला अनुभव...
महानगरपालिका रुग्णालयातील कोविड टेस्टचा सुखद अनुभव !
माझे स्वीय सहाय्यक कोरोनाबाधित झाल्यामुळे आणि मी त्यांच्या संपर्कात असल्यामुळे माझी कोविड चाचणी आज मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात करून घेतली. रीतसर रांगेत उभं राहून, मास्कच्या आड ओळख लपवून. प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की सुखद अनुभव होता अगदी याच ठिकाणी आपण शिकलो आहोत याचा अभिमान पुन्हा जागृत व्हावा असा !
मला मनापासून कौतुक वाटलं रेसिडेंट डॉक्टर्स आणि इंटर्नसचं !

डॉ. योगेश, डॉ. पायल, डॉ. सुजित आणि शुभम यांच्याशी आज टेस्ट दरम्यान संपर्क आला. अंगात घातलेले PPE सुट्स, लागलेल्या घामाच्या धारा सगळं असूनही चेहऱ्यावर (मास्कच्या आडून दिसतो तेवढ्या ) त्रागा नाही, आवाजात चिडचिड नाही. अगदी सराईतपणे हाताळलं जात होतं त्याबद्दल मनापासून कौतुक. फार्माकॉलॉजी, पॅथॉलॉजी मेडिसिन सगळ्या शाखांच्या रेसिडेंट्स ची सरमिसळ झाली आहे पण ज्या सुसूत्रतेने परिस्थिती हाताळली जाते आहे ती काबिले तारीफ म्हणायला हवी. कोरोनाच्या या लढाईत मास्क, व्हेंटिलेटर, आस्थापना याबरोबरच कुशल मनुष्यबळ देखील तेवढंच महत्वाचं हे पुन्हा अधोरेखित झालं.

त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे सर्वसामान्यांना देखील महापालिकेच्या रूग्णालयाबद्दल दिलासा मिळत आहे. नागरिकांच्या मनातील रूग्णालयांबाबतची भीती कमी होत आहे. यामुळे नागरिक सोशल मीडियावर त्यांचे कौतुक करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.