''देशातील परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे, हा देश कोणाच्या मनमानीने किंवा दडपशाहीने आम्ही चालू देणार नाही, संविधानावरच देश चालला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.''
बारामती : राष्ट्रवादी व शिवसेनेच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) आम्हाला निश्चित न्याय मिळेल, कायम सत्याचाच विजय होतो. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) व उध्दव ठाकरे यांनीच हे पक्ष स्थापन केले, वाढवले आहेत, त्यामुळे आज ना उद्या आम्हाला निश्चित न्याय मिळेल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले.