वेल्हे, (पुणे) - राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे अद्यापही जाहीर झाली नसली, तरीही भोर विधानसभा मतदारसंघांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी 'आमचं ठरलंय' असं म्हणत 'एकच वादा संग्राम दादा' म्हणत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आमदार संग्राम थोपटे त्यांचे नाव जाहीर केले आहे.
राजगड तालुक्यात विविध भूमिपूजनाच्या कार्यक्रमा नंतर कोंढावळे फाटा येथे एका मंगल कार्यालयात सोमवार (ता.०९) रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केले.