पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सॲप खाते हॅक केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास आता पुणे ग्रामीणच्या सायबर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
खासदार सुळे यांचे खाते हॅक करण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. खाते हॅक करून हॅकरने चारशे डॉलरची मागणी केली होती. याबाबतचा संदेश प्रसारित झाल्यानंतर सुळे यांच्या स्वीय सहायक महिलेने यवत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.