Pune News : अन्न व औषध आणि आरोग्य खात्याच्या ढिसाळ कारभार; अनुभवाच्या अटीमुळे रखडली पदभरती

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या दंतशल्यचिकित्सक संवर्गातील २८९ पदांसाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये एमपीएससीने जाहिरात काढली
food and drug health recruitment stalled due to experience requirement pune
food and drug health recruitment stalled due to experience requirement puneesakal
Updated on

पुणे : पदभरतीसाठी आवश्यक अनुभवाची अट स्पष्ट न झाल्यामुळे राज्यातील दंतशल्यचिकित्सक आणि औषध निरीक्षकांची भरती रखडली आहे. गांभिर्याची बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) संबंधीत विभागांकडे यासंबंधी स्पष्ट निर्देश देण्याची विनंती केली आहे, मात्र अजूनही राज्य शासनाने याचे उत्तर दिले नाही.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या दंतशल्यचिकित्सक संवर्गातील २८९ पदांसाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये एमपीएससीने जाहिरात काढली. मात्र, अनुभवांच्या सेवाअटींबद्दल स्पष्टता नसल्यामुळे एमपीएससीला पुढील कार्यवाही करता येत नाही. त्यामुळे एमपीएससीने २६ एप्रिल २०२३ रोजी पत्र लिहीले आहे.

food and drug health recruitment stalled due to experience requirement pune
Pune Crime : व्यापाऱ्यावर गोळीबार करणार्‍या आरोपींकडून दोन पिस्तुलांसह ३१ जिवंत काडतुसे जप्त

मात्र, अजूनही यासंबंधी स्पष्ट निर्देश नसल्यामुळे ही भरती रखडली आहे. तर दुसरीकडे औषध निरीक्षक पदाची भरती एमपीएससी मार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अनुभवाच्या सेवाअटींमुळे वादात सापडलेली ही भरती दोन वर्षांआधी स्थगित करण्यात आली. सध्या लाखो उमेदवार या पदभरतीची प्रतीक्षा करत असून २० महिन्यांपासून वर्षांपासून नव्याने जाहिरातच आलेली नाही.

उमेदवार म्हणतात...

- शासनाच्या उदासीनतेमुळे विविध पदांची भरती रखडलेली

- एमपीएससीच्या पत्रानंतरही संबंधीत विभागाकडून उशीर का

- विलंबामुळे हजारो उमेदवारांचे करिअर दावणीला

food and drug health recruitment stalled due to experience requirement pune
Pune Crime News : पोलीस दलात खळबळ! पुण्यात 'एसीपी'कडून पत्नी अन् पुतण्याची हत्या, स्वतःलाही संपवलं

मी दंतशल्यचिकीत्सक असून मागील दोन वर्षांपासून भरतीच्या प्रतिक्षेत आहे. मात्र, एमपीएससीला आरोग्य विभागाकडून कोणताही अभिप्राय मिळाला नाही. निकालासाठी मॅटचा निर्बंध आहे. जर आरोग्य विभागाचा निर्णय ३१ जुलै अखेर नाही मिळाला तर मॅटचा निर्बंध लांबणीवर पडू शकतो.

- राजेश, दंतशल्यचिकीत्सक

माझ्यासारखे अनेक विद्यार्थी खासगी संस्थेतील नोकरी सोडून औषध निरीक्षकाच्या पदभरतीचा अभ्यास करत आहे. मात्र, मागील २० महिन्यांपासून जाहिरातीस विलंब होत असल्याने आमचे करिअरच दावणीला लागले आहे.

- सतीष, उमेदवार

रिक्त पदांची संख्या...

  • दंतशिल्यचिकित्सक ः २८९

  • औषधनिरीक्षक ः ११७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()