Pune MPSC News: एमपीएससी चौकशी आयोगाची अद्याप एकही बैठक नाही; उर्वरित ४५ दिवसांत तपास कसा पूर्ण होणार?

MPSC Inquiry Faces Deadline Pressure With Only 45 Days Remaining: एमपीएससी चौकशीसाठी उरले ४५ दिवस; आयोगाच्या कामकाजाला अद्याप सुरुवात नाही
MPSC Investigation Delay Raises Concerns as 15 Days Pass Without a Meeting of the Commission Appointed to Probe Alleged Irregularities

MPSC Investigation Delay Raises Concerns as 15 Days Pass Without a Meeting of the Commission Appointed to Probe Alleged Irregularities

esakal

Updated on: 

-प्रज्वल रामटेके

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाच्या कामकाजाला अद्याप सुरुवात झाली नसल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी केला आहे. आयोगाला ६० दिवसांत अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली असताना, त्यातील १५ दिवस उलटूनही एकही बैठक झालेली नाही. तसेच, चौकशीचे नेमके स्वरूप आणि कार्यपद्धती निश्चित करणारा आराखडाही तयार झालेला नाही. त्यामुळे उर्वरित कालावधीत चौकशी पूर्ण होऊन ठोस निष्कर्ष समोर कसा येणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात चौकशी आयोगाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

Commission active under chairmanship of retired judge for MPSC inquiry
MPSC malpractice inquiry finally gets moving
MPSC Student Protest
aditya thackeray visit to mpsc student agitation