Pune Student Attack
दर्शना पवार हत्याप्रकरण ताजे असतानाच पुण्यातील प्रसिद्ध ठिकाण सदाशिव पेठ येथे दिवसाढवळ्या एका तरुणीवर तरुणाने कोयत्याने हल्ला केला. पादचाऱ्यांमुळं तरुणी वाचली. या हल्ल्यात तरुणीला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर तरुणीनं माध्यमांशी संवाद साधला.
हल्ला करणारी व्यक्ती माझ्या परिचयाची होती. माझा काही दोष नसताना त्यानं मला मारलं. कॉलेज जवळ येऊन धमक्या दिल्या. मी त्याच्याशी बोलणं बंद केलं. फोन करुन धमकी देत होता. अशी प्रतिक्रिया पिडित तरुणीने व्यक्त केली आहे.
माझा काही दोष नसताना....
तो माझा मित्र होता. त्याला मी नाही म्हटलं म्हणून त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. माझा काही दोष नसताना. कॉलेजपशी येऊन मला मारहाण करायचा. नाही म्हटलं म्हणून नुसता तो माझा पाठलाग करायचा. त्याच्या घरच्यांना सांगतिल पण त्याच्या घरच्यांनी दुर्लक्ष केलं. घरच्यांना सांगितलं म्हणून त्याने आज माझ्यावर वार केला. हाताला लागलं आहे. डोक्याला टाकं पडले आहेत.
मी कॉलेजला जात होते. त्यावेळी तो आला माझ्याशी पाच मिनीटं बोलं म्हणत होता. मी नाही म्हटलं. तिथं थांबले नाही. त्यानंतर त्यानं वार केला.
माझी मुलगी दिसली नसती...
त्याच्या घरच्यांना तक्रार केली असता त्याचे वडिल म्हणाले होते मी पाहतो त्याच्याकडे तुम्ही काळजी करु नका. त्याने तिला परत कॉल करुन धमकी दिली. वारंवार फोन करायचे नाही. पोलिसांत तक्रार करेन म्हटलं. तर त्याचा त्याला राग आला.
त्याने माझ्या मुलीचा पाठलाग केला. तेव्हा मी त्याला सांगतलं तु पुन्हा कॉलेजमध्ये दिसला नाही पाहिजे. तरी पण तो आज सकाळी आला. मी तिला कॉलेजला अर्धवट वाटेवर सोडलं. मी कामावर गेले. त्यानंतर ही घटना घडली. तिचा मित्र सोबत होता म्हणून ती वाचली. माझी मुलगी आज मला दिसली नसती. आईनं कामाला जायचं कसं? मुलींची सुरक्षा गेली कुठं? विश्वास कसा ठेवायचा? असो अनेक भावनिक सवाल पिडित मुलीच्या आईन उपस्थित केले.
कॉलेजला गेलेली मुलगी परत घरी येऊ शकते की नाही याची भिती वाटते. अशा मनोरुग्णांना जगू दिल नाही पाहिजे. अशी भावना पिडित मुलीच्या आईनं व्यक्त केली.
थरारक घटना
तरुणीवर तिच्या मित्राने सदाशिव पेठेत कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. हल्ला झाल्यानंतर ही तरुणी जीव मुठीत धरून धावायला लागली. मात्र तिच्या मागे कोयता घेऊन धावणार्या तरूणाला पाहुन कोणीच मदतीला पुढ आलं नाही.
जखमी अवस्थेत ती मुलगी धावत होती. एवढ्यात लेशपाल जवळगे नावाच्या तरुण त्या मुलीच्या मदतीला धावला. कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार एवढ्यात लेशपाल जवळगेने कोयता पकडला आणि हल्लेखोर तरणाला रोखले. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.