Baramati News : बारामतीत दोन महिन्यात शासकीय दरात एम.आर. आय. सुविधा उपलब्ध होणार

अत्याधुनिक 3.0 टेस्ला प्रणालीचे सिमेंस कंपनीचे मशीन बारामतीत कार्यान्वित होणार आहे.
Baramati News
Baramati Newsesakal
Updated on

बारामती : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी सुमारे 25 कोटी दहा लाख रुपये किमतीचे एमआरआय मशीन खरेदी करण्यासाठी आज परचेस ऑर्डर देण्यात आली .येत्या दोन महिन्यात बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात एम. आर. आय. मशीन कार्यान्वित होणार असून याचा लाभ असंख्य गरजू रुग्णांना होणार आहे.

Baramati News
NMC News : धोकादायक, संवेदनशील ठिकाणी निश्चित करा; महापालिका आयुक्तांच्या विभागप्रमुखांना सूचना

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास एम. आर. आय. मशीन मंजूर झाले होते. अत्याधुनिक 3.0 टेस्ला प्रणालीचे सिमेंस कंपनीचे मशीन बारामतीत कार्यान्वित होणार आहे. याबाबत संबंधित एजन्सीला वैद्यकीय शिक्षण विभागाने आज अधिकृतपणे खरेदीची परचेस ऑर्डर देऊ केली. शासकीय दरामध्ये एमआरआय सुविधा बारामतीत उपलब्ध नव्हती, या अत्याधुनिक मशीनच्या माध्यमातून बारामती पंचक्रोशीतील रुग्णांना शासकीय दरामध्ये एमआरआय करून घेणे शक्य होणार आहे.

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये यापूर्वी सिटीस्कॅन यंत्रणा कार्यान्वित झाली असून अपघात विभाग ही सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे गरजू रुग्णांची येथे मोठ्या प्रमाणात सोय होत आहे. एम. आर. आय. चाचणी करण्यासाठी खाजगी रुग्णालयांचा आधार रुग्णांना घ्यावा लागत होता, बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे गरजू रुग्णांना शासकीय दरामध्ये एमआरआय करून मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.