MSEB Symbiosis Agreement : महावितरण-सिंबायोसिस यांच्यात सामंजस्य करार

अभियांत्रिकी शिक्षणाला व्यावहारिक ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीची जोड देण्यासाठी महावितरण व सिंबायोसिस स्किल्स ॲण्ड प्रोफेशनल विद्यापीठामध्ये नुकताच ‘नॉलेज शेअरिंग’बाबत सामंजस्य करार करण्यात आला.
MSEB Symbiosis Agreement
MSEB Symbiosis Agreementsakal
Updated on

पुणे : अभियांत्रिकी शिक्षणाला व्यावहारिक ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीची जोड देण्यासाठी महावितरण व सिंबायोसिस स्किल्स ॲण्ड प्रोफेशनल विद्यापीठामध्ये नुकताच ‘नॉलेज शेअरिंग’बाबत सामंजस्य करार करण्यात आला.

महावितरणच्या पुणे परिमंडलाकडून यापूर्वी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठासह ३२ अभियांत्रिकी महाविद्यालयांसोबत ‘नॉलेज शेअरींग’चे सामंजस्य करार झाले आहेत. या करारानुसार सुमारे नऊ हजार ५०० अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह वीजक्षेत्रातील तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे. या करारावर महावितरणकडून मुख्य अभियंता राजेंद्र पवार व ‘सिंबायोसिस’कडून प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांनी स्वाक्षरी केली. यावेळी कुलगुरू डॉ. राजेश इंगळे, समन्वयक उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी व डॉ. महेश वाघ यांची उपस्थिती होती.

वीजक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, ज्ञानाचे आदान प्रदान, वीजसुरक्षा, महावितरणच्या विविध डिजिटल सेवा, आधुनिक तंत्रज्ञान आदींबाबत सिंबायोसिस विद्यापीठातील स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी स्टडीजच्या ‘स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल एनर्जी’ विषयातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधून ‘नॉलेज शेअरींग’ करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.