महावितरणचा राज्यातील पहिलाच प्रयोग: 'वेबीनार'मार्फत वीजग्राहकांशी साधला संवाद

MSEDCL first experiment in the state to Interact with electricity consumers through Webinar
MSEDCL first experiment in the state to Interact with electricity consumers through Webinar
Updated on

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महावितरणने पिंपरी विभागातील 180 हाऊसिंग सोसायट्यांचे फेडरेशनच्या 56 प्रतिनिधीशी 'वेबिनार'च्या माध्यमातून संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. महावितरण व वीजग्राहक यांच्यातील अशा संवादाचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महावितरणच्या पिंपरी विभाग अंतर्गत वाकड, हिंजवडी, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, रावेत, पुनावळे आदी परिसरातील सुमारे 18 हजार वीजग्राहकांच्या 180 हाऊसिंग सोसायट्यांची शिखर संस्था म्हणून पिंपरी चिंचवड को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन कार्यरत आहे. या सर्व परिसरातील वीजप्रश्न, महावितरणची विकासात्मक कामे, ग्राहकसेवा आदींबाबत "वेबिनार' च्या माध्यमातून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अडचणी जाणून घेतल्या. 

आणखी वाचा - बारामतीकरांचे सोने खरेदीचे आकडे वाचून थक्क व्हाल

सुमारे दीड तासांच्या या "वेबिनार' मध्ये सोसायट्यांच्या परिसरात होणारी वीजयंत्रणेतील नवीन कामे, मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच ऑनलाईन वीजबिल भरणा, विविध ग्राहकसेवा, सोसायट्यांसाठी नव्यानेच सुरु करण्यात आलेली "आरटीजीएस' व "एनईएफटी' आदी सुविधाची माहिती महावितरणकडून देण्यात आली. तर मोबाईल ऍपच्या अथवा वेबसाईटच्या माध्यमातून मीटर रिडींग पाठविणे, तसेच ऑनलाईनद्वारे वीजबिल भरणा करण्याची विनंती महावितरणकडून यावेळी ग्राहकांना करण्यात आली. ग्राहकांच्या वीजविषयक शंका, तसेच प्रश्नांना महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनीही उत्तरे दिली. 

पुणेकरांची चिंता वाढली; सदाशिव पेठेत औषधाच्या दुकानातील 33 जण कोरोना पॉझिटीव्ह!

तालेवार यांच्यासह गणेशखिंड मंडलचे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार, पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्तात्रेय बालगुडे, उपकार्यकारी अभियंता संतोष पटनी, तसेच पिंपरी चिंचवड को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे माजी अध्यक्ष सुदेश राजे, चिटणीस श्री. के. सी. गर्ग, सचिन लोंढे, अरुण देशमुख, सुधीर देशमुख यांच्यासह विविध सोसायट्यांच्या 56 पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. 

आणखी वाचा - पुण्याच्या रेडी झोनमध्ये आता धारावी पॅटर्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.