फुरसुंगी : एसटी चा ब्रेक निकामी झंआल्याने मंतरवाडीमध्ये बस चारचाकीला धडकून अपघात झाला.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.बस जेजुरी वरून हडपसरच्या दिशेने येत होती.बस मध्ये जवळपास २० प्रावशी होते. मंतरवाडीमध्ये येथे पोहचल्यावर गाडीचा ब्रेक निकामी झाला असल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने चालकाने बसचा वेग कमी करत बसवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर बसच्या पुढे थांबलेल्या चारचाकी वाहनाला सावकाश धडकल्याने बस थांबली.यामध्ये चारचाकीचेही जास्त नुकसान झाले नाही.
चालकाच्या प्रसंवधाने मोठी दुर्घटना टाळली.असे प्रथमदर्शी सोमनाथ यादव यांनी सांगितले.यावेळी काही काळ वाहातुक कोंडी झाली.स्थानिक नागरिक तात्यासाहेब भाडळे,नवनाथ हरपळे यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यास आणि वाहातुक सुरळीत करण्यात मदत केली.या ठिकाणी रोजच वाहातुक कोंडी होत असते.वाहनांच्या बिघाडामुळे वाहने स्त्याच्या मधोमध बंद पडण्याचे प्रमाण जास्त आहे.परिणामी वाहातुक कोंडीला सामोरे जावे लागते. वाहन चालकांनी वाहन रस्त्यावर आणण्यापूर्वी वाहनांची आवश्यक तपासणी करणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.