मे महिन्याच्या उन्हाळी सुट्यांमध्ये पर्यटकांना निखळ आनंद देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पर्यटकांना विविध सुविधा आणि सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे - मे महिन्याच्या उन्हाळी सुट्यांमध्ये (Summer Holiday) पर्यटकांना (Tourist) निखळ आनंद देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) (MTDC) पर्यटकांना विविध सुविधा आणि सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये (MTDC Resort) विवाह समारंभासाठीही बुकिंग (Booking) करण्यात येत आहे. त्यामुळे रमणीय समुद्रकिनारे आणि थंड हवेच्या ठिकाणी असलेले हे रिसॉर्ट (Resort) ‘वेडिंग डेस्टिनेशन’ (Wedding Destination) होत आहेत.
निसर्गरम्य समुद्रकिनारे, डोंगर रांगा, ऐतिहासिक ठिकाणे आणि थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये वेडिंग डेस्टीनेशन, प्री-वेडिंग फोटो शूट, रिसेप्शन म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे. महामंडळाच्या पानशेत आणि कार्लाच्या रिसॉर्टमध्ये नुकताच विवाह समारंभ पार पडला. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून विवाह समारंभाची आवश्यक तयारी करुन देण्यात येत आहे. तसेच, महाबळेश्वर येथे उद्योग संचालनालयाच्या वार्षिक नियोजनाची कॉन्फरन्स घेण्यात आली. कॉर्पोरेट कंपन्यांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कॉन्फरन्सलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ज्येष्ठ नागरिक, सरकारी कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती देण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी-माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी २० खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग तसेच शालेय सहलीसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. योगा आणि वेलनेसची शिबिर, स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
एमटीडीसीची नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोणावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे ही ठिकाणे पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत. नाशिक, लोणावळा (कार्ला), गणपतीपुळे आणि तारकर्ली येथे पर्यटक जलपर्यटनासाठी गर्दी करीत असल्याची माहिती एमटीडीसीकडून देण्यात आली.
‘एमटीडीसी’च्या वेडिंग डेस्टिनेशनमुळे विवाह समारंभासोबतच वधू-वर आणि मंडळींना निसर्गरम्य सहलीचाही आनंद घेता येतो. पानशेतमध्ये धरण परिसरात असलेल्या रिसॉर्टमध्ये स्वीमिंग पूल, थंड हवेच्या ठिकाणी असलेले महाबळेश्वर, कार्लामध्ये बोटिंगची सुविधा आहे. तसेच, खोल्यांचे बुकिंग, खाद्यपदार्थाचे मेन्यू अशा बाबींवर पॅकेजेस अवलंबून आहेत.
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी, पुणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.