बेवारस मृतदेहालाही मिळेना पोलिसांच्या हद्दीच्या वादामुळे 'मुक्ती'

12 तासानंतरही उचलला नाही मृतदेह, पोलिसांच्या असंवेदनशीलतेमुळे नागरीकांमध्ये संताप
death
deathfile photo
Updated on

पुणे : खडकी रेल्वे स्थानकावरील लोखंडी पुलावर शनिवारी सकाळी एका बेवारस व्यक्तीचा मृत्यु झाला. स्थानिक नागरीकांनी सकाळपासूनच खडकी पोलिसांना कळविले, त्यांनी ती हद्द लोहमार्ग पोलिसांची आहे, त्यांना सांगा असे सांगत आपल्यावरील जबाबदारी झटकली. लोहमार्ग पोलिसांनाही नागरीकांनी सांगितले, मात्र तेही फिरकले नाहीत. स्टेशन मास्तरनेही हद्द आमची नाही, त्यामुळे मृतदेह उचलण्यासाठी "मेमो' देऊ शकत नाही, असे सांगून हात झटकले. अखेर मृतदेहाला दुर्गंधी येऊ लागली, त्याभोवती मुंग्या जमू लागल्या. शहर व लोहमार्ग पोलिसांमधील हद्दीच्या वादामुळे 12 तास उलटूनही मृतदेहाला "मुक्ती' मिळालीच नाही.

death
पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया पडली लांबणीवर

खडकी रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी एका व्यक्तीचा मृत्यु झाला. रेल्वे स्थानक परिसरात चहा विक्री, स्वच्छता करणारे तसेच अपघातातील मृतदेह उचणाऱ्या व्यक्तींनी संबंधीत व्यक्तीचा मृत्यु झाल्याचे पाहीले. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासूनच नागरीकांकडून खडकी पोलिसांना सांगण्यात आले. त्यांनी रेल्वे स्थानकावरील पुल हा लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत येतो, त्यामुळे तुम्ही त्यांनाच सांगा, असे सांगितले. त्यानंतर नागरीकांनी लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. त्यांनीही नागरीकांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नागरीकांनी खडकी रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तरांना घडलेला प्रकार सांगून मृतदेह उचण्यास सांगितले. मात्र तो पुल महापालिकेच्या हद्दीत येतो, त्यामुळे मृतदेह उचलण्यासाठी आम्ही "मेमो' देऊ शकत नाही, अशी भुमिका घेतली.

सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत नागरीकांकडून पोलिसांना मृतदेह उचलण्याची विनंती केली जात होती. तरीही केवळ हद्दीच्या वादातुन पोलिसांकडून मृतदेह उचलण्यास असमर्थता दर्शविण्यात आली. पोलिसांमधील या असंवेदनशीलतेमुळे नागरीकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, हा सर्व प्रकार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोचविण्यात आला. त्यांनीही लोहमार्ग पोलिसांना कळवितो, असे सांगून सारवासारव केली. दिवस उलटल्यानंतरही मृतदेह मात्र जाग्यावरच पडून होता.

death
बैलगाडा शर्यतीबाबत स्टंटबाजी सुरु - अजित पवार

दारुगोळा कारखान्यात सेवा बजावलेल्या कुटुंबातील व्यक्ती

मृत व्यक्तीचे नाव गणेश आहे (पूर्ण नाव समजले नाही). त्याचे वडील दारुगोळा कारखान्यात नोकरीला होते. त्याचे वडील, आई, भाऊ रेंजहिल्स येथील सेवक वसाहतीमध्ये राहात होते. मात्र पाच-सहा वर्षांपुर्वी त्याच्या वडीलांपाठोपाठ आई व भावाचाही मृत्यु झाला. त्यानंतर गणेश एकटाच राहीला. तेव्हापासून तो खडकी रेल्वे स्थानक परिसरात भीख मागून उदरनिर्वाह करीत होता.

death
ब्रिगेडियर सुनील लिमये यांना यंदाचा अभिमान पुरस्कार

"काही नागरीकांनी सकाळीच पोलिसांना सांगितले. मी दुपारी तीन वाजल्यापासून खडकी पोलिस, लोहमार्ग पोलिसांना सांगितले. परंतु सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणीही मृतदेह उचलण्यासाठी आले नाही. पोलिसांमधील हद्दीच्या वादामुळे बेवारस मृतदेह सकाळपासून लोखंडी पुलावर पडून आहे.''

- विवियन डॉनियल केदारी, सरचिटणीस, शहर युवक कॉंग्रेस.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.