Pune News : मुळा मुठा नदी पूर रेषा होणार निश्चित; पण लागणार एवढा कालावधी
पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा व मुठा नदीची निळी व लाल पूररेषा २०११ आणि २०१६ मध्ये निश्चित करण्यात आलेली आहे. पण या ही पूररेषा योग्य पद्धतीने आखली गेलेली नाही.
पुणे - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुळा मुठा नदीची पूररेषा निश्चितीकरणासाठी समिती गठित करण्यात आली आहे. याचा अहवाल चार आठवड्यात सादर करावा असे आदेश दिले होते. मात्र, या अभ्यासासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे समोर आले आहे.