Video: पुण्यासाठी सोमवार ठरला 'अपघातवार'; ६ तासात झाले ६ अपघात

Accidents
Accidents
Updated on

धायरी (पुणे) : मुंबई-बेंगळुरु महामार्गावर नऱ्हे गावाच्या हद्दीत भूमकर पूल ते नवले पुला दरम्यान पहाटे चारच्या सुमारास चारशे मीटर अंतरामध्ये एका पाठोपाठ एक असे सहा अपघात झाले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा ते सात जण जखमी झाले. सुदैवाने अपघातात दोन महिन्याचे बालक वाचले.

तर कात्रज बोगद्यकडून आलेला एक ट्रक भूमकर पुलावरुन खाली कोसळला. या अपघातामुळे संपूर्ण महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. तर पुढे वाहतूक कोंडी झाली असताना दोन ट्रक भरधाव वेगात वाहतूक कोंडीत वाहनांना धडकले. 

सोमवारी पहाटे महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या ट्रकने समोरील ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. बोगद्यातून दारुची वाहतूक करणारा ट्रक (MH.12.PQ.8736) जात असताना नर्हे येथील I Love Narhe सेल्फी पॉईंटजवळ आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या माल वाहतूक ट्रकने (MH.18.AA.6681) पाठीमागून जोरात धडक दिली आहे. यात टॅकच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाल्याने चालक आणि त्याच्यासोबत असलेले तिघे त्यात अडकले. राजू मुजालदे, अजय मुजालदे राहणार मध्यप्रदेश हे दोघेही सखे भाऊ होते.

दरम्यान, दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. मृतदेह अडकून रुग्णालयात पकडले होते. पोलिस अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी अडकलेले मृतदेह बाहेर काढले आहेत. तसेच जखमींना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. हे दोन ट्रक एकमेकांना समोरासमोर धडकून पलटले होते. या अपघातामुळे महमार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

असे असतानाच कात्रजवरुन भरधाव वेगात आलेला ट्रक भूमकर पुलावरुन खाली कोसळला. तो खाली सर्व्हिस रस्त्यावर कोसळला. सुदैवाने त्यावेळी सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक नव्हती. त्याच दरम्यान दोन ट्रकमधून एक रिक्षा जात होती. मागील ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने ती पुढील ट्रकवर धडकली. रिक्षा दोन्ही ट्रकमध्ये सापडल्याने रिक्षा चालक, प्रवाशी महिला आणि तिचे दोन महिण्याचे बाळ आत अडकले होते. सिंहगड पोलिसांनी त्यांना सुखरुप बाहेर काढले. दरम्यान अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली असताना, भरधाव वेगात आलेल्या ट्रकने पुढील वाहनांना धडक देण्याच्या आणखी दोन घटना येथे घडल्या. यामध्ये पोलिसांची व्हॅन आणि एका कारचे नुकसान झाले. 
वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

अपघात पहिला :
कात्रज बोगद्याकडून नऱ्हेच्या दिशेने जाताना भूमकर पुलावर पहाटे चारच्या सुमारास दोन ट्रकचा भीषम अपघात झाला. दारुची वाहतूक कर
ट्रकला दुसऱ्या एका ट्रकने धडक दिली. त्यात एक गंभीर तर दोघे किरकोळ जखमी झाले. 

अपघात दुसरा :
हा अपघात झालेला असतानाच काही अंतरावर भूमकर पुलावरून स्पेअरपार्टची वाहतूक करणारा आयशर ट्रक उलटून सेवा रस्त्यावर अपघात झाला. यामध्येही ट्रक चालक जखमी झाला. 

अपघात तिसरा :
नऱ्हे येथील अपघाताची खबर मिळाल्यावर घटनास्थळी ग्रामीण पोलिसांची गाडी जात होती. यामध्ये त्यांच्या गाडीला भरधाव कंटेनरने उडवले. यामध्ये गाडीचा चक्काचूर झाला असून सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नाही. पोलिस उपनिरीक्षक कदम हे किरकोळ जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. 

अपघात चौथा :
नवीन कात्रज बोगद्याजवळ चौथा अपघात झाला. दरी पुलाकडून साताऱ्याहून मुंबईकडे जाणारी रिक्षा मागील ट्रकने धडक दिल्याने पुढील ट्रकला धडकली. यामधून दोन महिण्याचे बालक आणि तिच्या आईची सुटका करण्यात आली. 

अपघात पाचवा :
अर्टिंगा कार आणि एक ट्रक एकमेकांना घासून गेल्याने अपघात झाला. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले.

अपघात सहावा :

तक्षशिला सोसायटीच्यासमोर कंटेनरने पुढे असणाऱ्या टेम्पोला धडक दिल्याने कंटेनरच्या समोरील भागाचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

चोवीस तासात जास्तीत जास्त उपाययोजना करून अपघात होणार नाही, याची दखल घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच स्थानिक पोलिस आणि वाहतूक विभागाला देखील आदेश देण्यात आले आहेत.

- शंभूराजे देसाई, गृहराज्यमंत्री

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.