रानगव्याच्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाची वन विभाग आणि आयुक्तांना नोटीस

गेल्या वर्षी कोथरूडमध्ये आलेल्या रानगव्याच्या मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य वन विभाग आणि पुणे पोलिस आयुक्तांना नोटीस काढली आहे.
mumbai high court
mumbai high courtsakal
Updated on

पुणे : गेल्या वर्षी कोथरूडमध्ये (Kothrud) आलेल्या रानगव्याच्या मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai HighCourt) राज्य वन विभाग (State Forest Department) आणि पुणे पोलिस आयुक्तांना नोटीस काढली आहे. १७ जानेवारीपर्यंत म्हणणे मांडावे, असे आदेश न्यायालयाने या नोटीसद्वारे दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने या नोटिसा जारी केल्या आहेत. कोथरूड भागात ९ डिसेंबर २०२० रोजी रानगवा आल्याने सर्वच यंत्रणांची तारांबळ उडाली होती. सात तासाच्या थरारनाट्यानंतर त्याला बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आले. मात्र त्यानंतर काही वेळाने गव्याचा मृत्यू झाला होता.

mumbai high court
गणेशखिंड रस्त्यावर आठवडाभरात वाहतूक सुधारणा होणार : आयुक्त

हृदयविकाराच्या झटक्याने या गव्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी वनरक्षक दलाचे अधिकारी गव्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचा दावा करीत ‘लॉयर्स फॉर अर्थ जस्टीस’ या वकिलांच्या टीमने अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत डिसेंबर २०२० मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर तब्बल एक वर्षांनी सोमवारी (ता. २०) ही याचिका सुनावणीसाठी घेण्यात आली.

यावेळी याचिकाकर्त्या टीमचे अ‍ॅड. अक्षय धिवरे, अ‍ॅड. हर्षल जाधव, अ‍ॅड. अनुला सोनवणे इत्यादींच्या वतीने अ‍ॅड. असीम सरोदे आणि अ‍ॅड. अजिंक्य उडाणे यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. याचिकेची दखल घेत १७ जानेवारी २०२२ पर्यंत महाराष्ट्र वन विभाग आणि पुणे पोलिस आयुक्त यांनी त्यांचे म्हणणे मांडावे, असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()