Mumbai : महाराष्ट्र भूगोल समितीतर्फे पाठ्यपुस्तकातील नकाशे बदलण्याची गरज

राज्यात महसूल विभाग, वन आणि पर्यावरण, पाटबंधारे आणि रस्ते विभाग यांनीही हे बदल एका महिन्यात करावेत.
Coming Soon Map
Coming Soon Map sakal
Updated on

पुणे - ‘‘राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्हा नामांतराचा निर्णय घेतला. आता त्यानुसार शिक्षण विभाग आणि बालभारतीने महाराष्ट्र दिनी (ता.१) राज्याचा नवा नकाशा प्रसारित करावा. हा नकाशा भिंतीवर लावण्यायोग्य असावा.

तसेच पाठ्यपुस्तकातील नकाशात बदल करून नव्या शैक्षणिक वर्षापासून नवीन नकाशा उपलब्ध करून द्यावा,’’ अशी मागणी महाराष्ट्र भूगोल समितीने निवेदनाद्वारे केली आहे.

Coming Soon Map
Mumbai Local Train : पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलचा खोळंबा; वांद्रे स्थानकात सिग्नल बिघाड

राज्यात महसूल विभाग, वन आणि पर्यावरण, पाटबंधारे आणि रस्ते विभाग यांनीही हे बदल एका महिन्यात करावेत. तसेच माहिती व जनसंपर्क विभाग, गॅझेटियर विभाग यांनीही नव्या जिल्ह्याची प्राधान्याने आणि इतर जिल्ह्याची माहिती पुस्तकात व ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक नकाशे अद्ययावत करावेत.

नव्याने राज्य सरकारने औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्हा नामांतर केल्याची माहिती नव्या पिढीपर्यंत, युवकांपर्यंत पोचविण्यासाठी सर्व शासकीय, अर्धशासकीय कार्यालये आणि विविध संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सुरेश गरसोळे यांनी निवेदनाद्वारे सुचविले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन समितीतर्फे देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.