Mumbai Pune dam level live update
Mumbai Pune dam level live updateesakal

Mumbai Pune Dam Lavel: पावसाचा धुमाकूळ पण मुंबई, पुण्यात पाणीसाठा किती? धरणांची संपूर्ण स्थिती एका क्लिकमध्ये...

Current dam level in Mumbai Pune : दोन दिवसांत राज्यातील धरणांत ११६ टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईतील सातही जलाशयांमध्ये निम्म्याहून अधिक (53.12 टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे.
Published on

Khadakwasla Panshet Tansa Modak Sagar dam level

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक तर कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. ताम्हिणी घाटमाथ्यावर ५५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवसांत राज्यातील धरणांत ११६ टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

वरसगाव, वारणा, बेंबळा, गोसी खुर्द, इटियाहोड, कासारसाई, मुळशी, वडीवळे, खडकवासला, वीर, राधानगरी, चिल्हेवाडी, अलमट्टी, कळमोडी ही धरणे भरली असून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वैनगंगा, मुळा, मुठा, कृष्णा, कोयना, पंचगंगा, पवना, इंद्रायणी, आरळा, कानंदी अशा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

खडकवासला – ९८.४१ टक्के
टेमघर – ६७.०८ टक्के
वरसगाव – ६९.४८ टक्के
पानशेत –  ८१.६२ टक्के

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

अप्पर वैतरणा – ३४.४३ %
मोडक सागर – ९८.४६ %
तानसा – ९९ %
मध्य वैतरणा – ६३.०३ %
भातसा – ६४.०७ %
विहार – ९९ %
तुळशी – ९९ %

पालघर येथील धामणी किंवा सूर्या धरण ७९ टक्के आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा आणि मोडकसागर धरणे पूर्णपणे भरली आहेत. पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हावर गेल्याने चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. मुंबईतील सातही जलाशयांमध्ये निम्म्याहून अधिक (53.12 टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे.

Mumbai Pune dam level live update
Pune Rain Update: पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी Indian Army मैदानात! गरज पडल्यास Air Force सज्ज...

कोयना धरणातून विसर्ग-

कोयना धरणातून आज सायंकाळी २० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना-कृष्णा नदीची पाणी पातळी वाढणार आहे. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आज पुरबाधित तांबवे व परिसरातील घरांमध्ये पाणी शिरणाऱ्या परिसराची पाहणी केली आहे. ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आणेतील सात कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

खडकवासला धरणाचे व्यवस्थापन-

खडकवासला धरणाची क्षमता पावणे तीन टीएमसी एवढी आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे खडकवासला धरण ५० टक्के भरले होते. काल दिवसभर आणि रात्री धरणाच्या वरच्या क्षेत्रात मोठा पाऊस पडला. त्यामुळे तीन टीएमसीपेक्षा जास्त पाणी धरणात आले. नागरिकांच्या सोय आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणाचे पाणी पहाटे सोडण्यात आले, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Mumbai Pune dam level live update
Pune Rain Update: पुणे जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर... मुठा खोरेतील गावांचा संपर्क तुटला, मुळा नदीला महापूर Video पाहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.