Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु, मलबा हटवण्याचं काम संपलं

Mumbai-Pune Expressway
Mumbai-Pune Expresswayesakal
Updated on

पुणेः 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर दरड कोसळली होती. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आता पुन्हा वाहतूक सुरु झाली आहे.

महामार्गावरील कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली होती. रस्त्यावरील मलबा हटवण्याचं काम सुरु होतं. तब्बल तीन तासांनंतर हे काम संपलं असून वाहतूक सुरळीत झाली आहे.

Mumbai-Pune Expressway
Rahul Kul: राहुल कुल यांना क्लीनचीट, राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, दौंड कार्टानं...

मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळण्याची घटना ताजी असताना गुरूवारी रात्री कामशेत बोगद्याच्या तोंडाजवळ पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली. गुरूवारी रात्रीच्या सुमारास दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. परंतु बोगद्याच्या तोंडाजवळ काही प्रमाणात कोसळलेल्या दरडीचा भाग रस्त्यावरच होता. त्यामुळे आज मेगाब्लॉक घेण्यात आलेला होता.

आज दुपारी २ ते ४ यावेळेत मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक किवळे पासून वळवली होती. तर मुंबई शहराकडे येणारी वाहने जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने सुरू होती. आता रस्त्यावरील काम संपलं असून वाहतूक सुरळीत झालेली आहे.

Mumbai-Pune Expressway
Monsoon Session of Parliament: राज्यसभेत सुद्धा होणार धुमशान, थेट उपसभापतींना जारी केला व्हीप! नियम काय म्हणतो?

मागच्या दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु झालेला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. पावसामुळे मुंबई-पुणे रस्त्यावर यापूर्वीदेखील दरड कोसळली होती. काल रात्री पुन्हा दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.