Mumbai Pune Highway : जन्म बाईचा... बाईचा...‘गैरसोयींचा’! मुंबई-पुणे मार्गावर स्त्रियांसाठी पुरेशी स्वच्छतागृहेच नाहीत

प्रवाशांसह महिला कर्मचाऱ्यांना त्रास
Mumbai Pune Highway
Mumbai Pune HighwaySakal
Updated on

Mumbai Pune Highway - शिवानी (नाव बदलले आहे) ही अठ्ठावीस वर्षीय तरुणी मुंबईला जाण्यासाठी स्वारगेट स्थानकावर बसमध्ये बसली. वनाज येथे बस थांबल्यावर तिने थांब्यावर स्वच्छतागृह आहे का, याबाबत कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. त्यावर तिला नाही, असे उत्तर मिळाले.

पुढे चांदणी चौक आणि वाकड येथील थांब्यांवरही तिला तोच अनुभव आला. अखेरीस दोन तासांनंतर एका उपाहारगृहापाशी बस थांबली, त्यावेळी स्वच्छतागृहाचा वापर तिला करता आला.

Mumbai Pune Highway
Mumbai Bomb Blast : तारीख होती 13 जुलै, एकाच शहरात एकाच दिवशी 3 बाँब स्फोट अन् प्रेतांचा सडा...

शिवानीचा हा अनुभव प्रातिनिधिक आहे. पुणे-मुंबई रस्त्यावर, किंबहुना इतर अनेक रस्त्यांवर स्त्रियांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रचंड अभाव आहे. केवळ महिला प्रवाशांनाच नव्हे, तर परिवहन विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना यांमुळे किती त्रास सहन करावा लागत असेल, याची कल्पनाही न केलेली बरी. स्त्रीमुक्ती चळवळ सुरू होऊन आज बराच काळ लोटला असतानाही,

स्त्री-पुरुष समानतेविषयी अनेक मोठमोठ्या व्यासपीठांवर चर्चा होत असतानाही स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित अतिशय मूलभूत अशा प्रश्नाबाबतही आपल्याकडे प्रचंड उदासीनता आहे. त्यामुळे ‘जन्म बाईचा... बाईचा... गैरसोयींचा’, असे म्हणण्याची वेळ स्त्रियांवर आली आहे.

Mumbai Pune Highway
Pune Crime : हडपसर, वानवडी परिसरात मटका जुगार अड्डे राजरोसपणे सुरू ; दोन दिवसांत ५१ जण ताब्यात

महिलांच्या प्रश्नासंदर्भात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि युनायटेड नेशन्स फेलो मयुरी धुमाळ यांनी या संदर्भात समाज माध्यमांवर नुकतीच एक पोस्ट लिहिली. एका कंडक्टर महिलेचा अनुभव त्यांनी विशद केला. ‘वनाजला काम करताना रस्त्यापलीकडे असणाऱ्या गॅस पंपावरील स्वच्छतागृहाचा वापर करतो.

पण वाकड, चांदणी चौकात फार गैरसोय होते. मग आठ तास ड्युटी संपायची वाट बघत तग धरुन राहायचे. गाडीत तिकीट काढून देण्याची ड्युटी असेल तर पुणे-मुंबई प्रवासात स्वारगेटवरुन निघालेली गाडी थेट खालापूर टोलनाक्यापूर्वी उपाहारगृहापाशी थांबते.

अगदीच गरज असल्यास तळेगाव टोलनाक्याला गाडी थांबवायची, तिथे जरा तरी चांगले स्वच्छतागृह उपलब्ध आहे. नाहीतर थेट जे गंतव्य स्थान असेल, त्याच आगारात संधी मिळते’, असे या कंडक्टर महिलेने सांगितले.

Mumbai Pune Highway
Mumbai Rain Update : पावसाची उघडीप तरीही खड्डे जैसे थे... अधिकाऱ्यांवर समाज माध्यमातून टिकेची झोड

बहुतेक महामंडळाच्या प्रवास मार्गात हीच परिस्थिती असते. स्वच्छतागृह असले, तरी ते स्वच्छ आणि वापरण्यालायक नसते. परिवहन विभागाची स्वच्छतागृहे फक्त बस आगारात असतात. रस्त्यावरील थांब्यांवर तशी सोय नसते.

‘झटका ऑर्गनायझेशन’ या संस्थेमार्फत आम्ही लवकरच याचिका दाखल करुन राज्यभर परिवहन थांब्यांवर स्वच्छ आणि वापरण्यायोग्य स्वच्छतागृहे असावेत, अशी मागणी करणार आहोत.

- मयुरी धुमाळ, सामाजिक कार्यकर्त्या

Mumbai Pune Highway
Mumbai Court : 'पाळीव प्राणी ही भावनिक गरज', पत्नीला तीन श्वानांच्या देखभालीसाठी रक्कम द्यावी; कोर्टाचे विभक्त पतीला आदेश

मुंबई-पुणे प्रवासात मला नेहमीच असा अनुभव येतो. उपाहारगृहाखेरीज अन्य कोठेही चांगले स्वच्छतागृह उपलब्ध नसते. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये तर हा प्रवास प्रचंड त्रासदायक ठरतो. -

कल्पना थिटे (नाव बदलले आहे)

स्वच्छतागृह काय किंवा अन्य काही, कोणत्याही योजनेत किंवा आखणी करताना आपल्याकडे स्त्रियांचा विचार केला जातच नाही. याचे कारण म्हणजे आखणी करणाऱ्यांमध्ये स्त्रियांचा समावेशच नसतो. आपण जोवर स्त्रियांच्या प्रश्नांकडे गंभीरपणे पाहत नाही, त्याला महत्त्व देत नाही, तोवर हे असेच सुरू राहणार.

मिहिका देशमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.