मुंबईकर, पुणेकरांनी लसीकरणात मारली बाजी!

Corona vaccine
Corona vaccineGoogle file photo
Updated on

पुणे : राज्यातील नागरिकांनी कोरोना(Corona) प्रतिबंधक लस(Vaccine) घेण्याचा नवा उच्चांक मंगळवारी केला. एका दिवसात पाच लाख ५५ हजार ०६९ लशीचे डोस देण्यात आले. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मुंबईकर(Mumbai) आणि पुणेकरांनी (Pune) लसीकरणात बाजी मारली.(Mumbai Pune people Active vaccination 5 lakh 55 thousand doses taken in one day)

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आतापर्यंत ५९ लाख ७९ हजार ५१ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. कोरोनाच्या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याबरोबरच लस हे आणखी प्रभावी साधन उपलब्ध झाले आहे. त्याला राज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचे चित्र आजच्या आकडेवारीतून पुढे आले आहे.

Corona vaccine
पुण्यात चारी धरणात मिळून 8 टीएमसी पाणीसाठा

राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. सुरवातीला आरोग्य सेवक, त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर यांना प्राधान्याने लस दिली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, प्रौढ आणि आता १८ वर्षे वयाच्या नागरिकांसाठीही लसीकरण खुले केले. त्यामुळे राज्यातील पाच हजार ९२ लसीकरण केंद्रांवर नागरिकांना लस देण्याचा नवा उच्चांक करण्यात आला. आज सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून पाच लाख ५२ हजार ९०९ नागरिकांनी लस घेतली. यापूर्वी २६ एप्रिलला पाच लाख ३४ हजार जणांनी एकाच दिवशी लस घेण्याचा उच्चांक होता. तो मागे टाकून लसीकरणाचा नवीन उच्चांक केल्याची माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात कोरोनाचा सर्वांत मोठा उद्रेक मुंबई आणि पुण्यात झाला. त्यामुळे या दोन प्रमुख शहरांमधील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला. मुंबईमध्ये दिवसभरात एक लाख १२ हजार ३७८ जणांनी लस घेतली. तर, पुणे जिल्ह्यातील ५६९ केंद्रांमधून ६९ हजार १२१ नागरिकांनी लस घेतली. त्यात ४०० केंद्र सरकारी असून, उर्वरित १६९ केंद्र खासगी असल्याचेही आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले.

Corona vaccine
रक्ताने ‘सॉरी मॉम’ लिहून पुणे पोलिसाची आत्महत्या

दिवसभरातील लसीकरण
राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या : ५,०९२
सरकारी केंद्रांची संख्या : ४,६७४
खासगी केंद्रांची संख्या : ४१८

आतापर्यंतचे लसीकरण
१६ जानेवारीपासून दिलेले लशीचे डोस : २,८६,९७,९४८
पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या : २,३०,८२,२४३
दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या : ५६,१५,७०५

प्रमुख जिल्ह्यांतील लसीकरण
मुंबई : १,१२,३७८
पुणे : ६९,१२१
ठाणे : ६०,५८२
नागपूर : २७,०४४
नाशिक : २६,१८७
औरंगाबाद : १८,८१३
कोल्हापूर : १३,६९२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.