Pune News : महापालिकेचे सात हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामात

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेतील सात हजार पेक्षा जास्त कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे - पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेतील सात हजार पेक्षा जास्त कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ८ हजार ४६२ बूथ आहेत. त्यापैकी सुमारे अडीच हजार बूथ हे पुणे शहराच्या हद्दीत आहेत. २१ लाखापेक्षा जास्त मतदार शहरात आहेत. निवडणूक आयोगाकडून नागरिकांच्या सोईसाठी घराजवळ मतदान केंद्र निर्माण करण्यावर भर आहे, त्यामध्ये मोठ्या सोसायट्यांमधील हॉल घेतले जात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.