Pune Municipal Employee : महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळीचा बोनस

पुणे महापालिकेतील सुमारे १८ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेतील सुमारे १८ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. त्यांना दिवाळीपूर्वी ८.३३ टक्के बोनस त्याचप्रमाणे २३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. याबाबत वित्त व लेखा विभागाने यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.

पुणे महापालिकेकडून दरवर्षी महापालिका अधिकारी, कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान आणि बोनस देण्याचा निर्णय दिला जातो. यासाठी अर्थसंकल्पात सुमारे १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महापालिकेत नगरसेवक असताना यासाठी स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर केला जात असतं. तसेच हा प्रस्ताव मंजूर करून घेतल्यानंतर याचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांमध्ये चढाओढ लागत होती. पण आता महापालिकेवर प्रशासक असल्याने ही प्रक्रिया सहज पूर्ण होत आहे.

लेखा व वित्त विभागाने काढलेल्या परिपत्रकात १८ ऑक्टोबर पर्यंत सर्व बिले तपासून घेण्याचे आदेश विभाग प्रमुखांना देण्यात आले असून, दिवाळीपूर्वी ही रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

२०२३-२४ च्या मुळ वेतन,महागाई भत्ता यावर ८.३३ टक्के आणि २३ हजार रुपये सानुग्रह अनुदान उपस्थितीच्या प्रमाणात दिले जाणार आहे. गेल्या वर्षभरात संबंधित सेवकांची प्रत्यक्ष हजेरी किमान १८० दिवस असणे आवश्‍यक आहे, अशांना ही रक्कम दिली जाणार आहे.

सानुग्रह अनुदानाबाबतच्या अन्य अटी व शर्ती तसेच सेवापुस्तक व वेतन बिलावर ठेवावयाचे दाखले याबाबतचा तपशील दिलेला आहे, त्यानुसार तजवीज करावी. तसेच संघटना निधीची कपात करण्यात येणार आहे, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.