धीरज,आम्हाला नाही तुझी गरज; घाटेंच्या पोस्टरबाजीला जशास तसे उत्तर

dhiraj we dont need you opponents respond to Dhiraj Ghate poster campaign
dhiraj we dont need you opponents respond to Dhiraj Ghate poster campaign
Updated on

पुणे : चार दिवसांपुर्वी शहरातील नवीन प्रभाग रचना जाहीर झाली असून महानगरपालीकेच्या निवडणूकीच्या (Municipal Elections 2022) पार्श्वभूमीवर शहरात राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. स्थानिक नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. नुकतेच शहरात नगरसेवक आणि विरोधकात एक पोस्टर वॉर झाल्याचे पाहायला मिळाले.

नेमके झाले असे की, भाजप(BJP) चे विद्यामान नगरसेवक धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांनी निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून नव्या प्रभागात सर्वत्र ‘जिथे गरज तिथे धीरज’ अशी घोषणा करीत बॅनर लावले आहेत. त्यांच्या या बॅनरला विरोधकांना तबडतोब उत्तर देत त्याच बॅनरखाली ‘धीरज.. आम्हाला नाही तुझी गरज. आता घरी जा परत..’ असे बॅनर लावल्याने एकच चर्चा सुरु होत आहे.

या बॅनरबाजीमुळे राजकारण पेटण्याची शक्यता आहे, निवडणूक जाहीर होण्यास आणखी वेळ असला तरी जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे असे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात काही दिवसांपुर्वी नवीन प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. नव्या प्रभागामध्ये नेत्यांना स्वतःची पकड निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी अनेक इच्छुक कामाला लागले आहेत. दरम्यान नगरसेवक घाटे यांनी बॅनरच्या माध्यमातून नागरीकांसाठी त्यांचे संपर्क क्रमांक या बॅनरवर दिले आहेत. त्यांच्या याच बॅनरखाली विरोधकांनी असा मजकूर लिहिलेले बॅनर लावले आहेत.

dhiraj we dont need you opponents respond to Dhiraj Ghate poster campaign
पुणे: स्लॅब दुर्घटनेतील कामगारांना अजित पवारांकडून श्रद्धांजली; पाच लाखांची मदत

नगरसेवक धिरज घाटे यांना विरोध करतानाच पुण्याचे खासदार गिरीश बापट व कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांनाही अशाच पध्दतीने विरोध करण्यात आला आहे. ‘नको बापट, नको टिळक, पुणेकरांना पाहिजे नवी ओळख, अशी घोषणा लिहिण्यात आली आहे.

सध्या पुणे शहरात भाजपा विरूद्ध राष्ट्रवादी अशी लढत निवडणूकीआधीच रंगू लागली आहे.भाजपा-राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार की महाराष्ट्र विकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कॉंग्रेस स्वतंत्र लढणार असेल तर राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, यावर तीन्ही पक्षाकडून अद्याप कोणतीच स्पष्टता दिसत नाही.

dhiraj we dont need you opponents respond to Dhiraj Ghate poster campaign
टेस्लाच्या भारतात एंट्रीला झटका; सरकारचा करात सूट देण्यास नकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.