पुणे : कोरोनाचे (Corona) निर्बंध शिथिल झाले असले तरी, अद्याप देखील महापालिकेची मुख्यसभा ऑनलाईन( Online) होत आहे. हे निर्बंध हटविण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नगरविकास खात्याचे सचिव महेश पाठक यांना दिले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात याबाबत आदेश निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Pune News)
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या (Ncp) पदाधिकाऱ्यांची विश्रामगृह येथे घेतलेल्या बैठक घेण्यात आली. त्यामध्ये शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर चुकीचे काम होत असताना तुम्ही विरोध का करत नाहीत, असा प्रश्न पवार यांनी केला. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची मुख्यसभा ही ऑनलाइन होत आहे, नगरसेवकांना बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात, अशी तक्रारींचा सूर पदाधिकाऱ्यांनी लावला.
त्याच वेळी पवार यांनी थेट नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक यांना फोन करून त्यांना याबद्दल चौकशी केली. त्यावेळी पाठक यांनी हा प्रस्ताव तयार असून, तो येत्या आठवड्यात याबाबत आदेश काढले जातील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एका आठवड्यात हा आदेश निघाल्यास आगामी मुख्यसभेत विषय आक्रमकपणे मांडला येतील, असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.