खासगी प्रयोगशाळांची महापालिका घेणार बैठक

कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचे असताना देखील महापालिकेला खासगी प्रयोगशाळांकडून चुकीची माहिती मिळत आहे.
Pune Municipal
Pune MunicipalSakal
Updated on

पुणे - कोरोना (Ccorona) बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (Contract Tressing) महत्त्वाचे (Important) असताना देखील महापालिकेला (Municipal) खासगी प्रयोगशाळांकडून (Private Laboratory) चुकीची माहिती (Wrong Information) मिळत आहे. त्यामुळे सध्याच्या या कामाच्या पद्धतीत बदल करण्यासाठी १ जून (मंगळवारी) रोजी खासगी प्रयोगशाळा, रुग्णालयांच्या डॉक्टरांची बैठक घेण्यात येणार आहे. (Municipal meeting of private laboratories will be held)

Pune Municipal
परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यात 15 ठिकाणी लसीकरण

खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केल्यानंतर यामध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या नागरिकांचा पत्ता, घराजवळची खूण, फोन नंबर, संपर्कात असलेल्या नातेवाइकांची व इतरांची नावे घेणे आवश्‍यक आहे. पण ही माहिती घेण्यात टाळाटाळ केली जात होती. अनेकदा कोरोना बाधित रुग्णांचे चुकीचे पत्ते, चुकीचा मोबाईल क्रमांक दिला जात होता. तसेच जुन्या रुग्णांची नावे पुढच्या महिन्याच्या यादीत देखील येत होती. तर काही वेळा चाचणी निगेटिव्ह आलेल्या नागरिकाचे नाव पॉझिटिव्ह यादीमध्ये येत आहेत. त्यामुळे संबंधित नागरिकाचा व महापालिकेचा गोंधळ उडत आहे. दुबार नावे, चुकीची माहिती यामुळे महापालिकेला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना अडचणी येत आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याने संक्रमण रोखण्यामध्ये अपयश आले आहे. महापालिका, खासगी लॅब व डॉक्टरांमध्ये समन्वय राहावा यासाठी कार्यपद्धती निश्‍चीत केली जाणार आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कार्यपद्धतीत बदल करायचे प्रयत्न यापूर्वीही केले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आणखी चांगल्या पद्धतीने काम झाले पाहिजे यासाठी १ जून रोजी महापालिका, लॅब आणि डॉक्टरांची बैठक घेतली जाणार आहे.

- डॉ. कल्पना बळीवंत, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.