PMP Bus : महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवास; उद्यापासून अर्ज वाटप

विद्यार्थ्यांना मोफत पाससाठी १२ जूनपासून अर्जाचे वाटप सर्व आगारांमधून आणि पास केंद्रांवर करण्यात येणार आहे.
PMP Bus
PMP Bussakal
Updated on

पुणे - पीएमपी प्रशासन पुणे महापालिकेच्या शाळेतील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के अनुदानित मोफत तर पुणे महापालिका हद्दीतील खासगी शाळेतील इयत्ता ५ वी ते इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांना ७५% अनुदानित मोफत बस प्रवास पास देणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना मोफत पाससाठी १२ जूनपासून अर्जाचे वाटप सर्व आगारांमधून आणि पास केंद्रांवर करण्यात येणार आहे. तसेच भरून दिलेले अर्ज महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील. संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठीचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारांमधून एकत्रितरीत्या घेऊन जाऊ शकतात.

तसेच हे अर्ज भरून एकत्रितरीत्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेला एकत्रित पास दिले जातील. महामंडळाने दिलेले हे सर्व पास शाळा प्रमुखांनी त्यांच्या शाळेत वितरित करावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.