Sharad Mohol Murder : पुण्यात गँगवॉर भडकणार? मोहोळवर गोळीबार करताना आरोपीकडून कुख्यात गुंडाच्या नावाने घोषणाबाजी

पुण्यात शरद मोहोळ हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांची नावे समोर आली आहेत.
Sharad Mohol Attacked
Sharad Mohol Attacked
Updated on

पुणे : पुण्यात शरद मोहोळ या कुख्यात गुंडाची हत्या झाल्याने राज्यासह देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलीसांनी तत्काळ कारवाई करत दोन वकिलांसह आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मोहोळ याच्यावर फायरिंग करणारा मुन्ना पोळेकर याने फायरिंग वेळी पुण्यातील एका नामांकित गुंडाच्या नावाने घोषणाबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील कोथरूड परिसरात पाच तारखेला (शुक्रवार) सुतारदरा जवळील गुंड शरद मोहोळ याच्या केबल ऑफिस समोर मोहोळ याच्यावर आरोपी मुन्ना पोळेकर याने त्याच्या दोन साथीदारासह फायरिंग केली होती. या फायरिंग वेळेस आरोपींनी पुण्यातील एका नामांकित गुंडाच्या नावाने घोषणाबाजी केल्याची माहिती समोर येत आहे. या हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांची नावे समोर आली आहेत.

Sharad Mohol Attacked
पुन्हा ठाकरेंना धक्का बसणार? शिवसेना अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट आली समोर; दोन दिवसात येणार निकाल

पुण्यात गँगवॉरची शक्यता

आरोपींनी नामांकित गुंडाची घोषणाबाजी करून पोलिसांचा तपास भरकटवण्याचा आहे का? त्या खरंच त्या आरोपी गुंडांनी त्यांना मारण्यासाठी सुपारी दिली याचा तपास आता पोलीस करत आहेत. आरोपी मुन्ना पोळेकर यांनी केलेल्या घोषणेबाजीमुळे भविष्यात पुण्यामध्ये गँगवर पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sharad Mohol Attacked
PM Modi : मालदीवला मोठा झटका! EaseMyTrip ने सस्पेंड केल्या सर्व फ्लाइट्स बुकिंग; PM मोदींवरील टिप्पणी चांगलीच भोवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.