Murlidhar Mohol : मुळा-मुठा होणार सुंदर अन् प्रदूषणमुक्त

शहराची पुढील पंचवीस वर्षांची गरज लक्षात घेऊन निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी मुळा-मुठा पुनर्जीवन प्रकल्प आणि नदीकाठ सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभेचे महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
Murlidhar Mohol
Murlidhar Moholsakal
Updated on

पुणे : शहराची पुढील पंचवीस वर्षांची गरज लक्षात घेऊन निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी मुळा-मुठा पुनर्जीवन प्रकल्प आणि नदीकाठ सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभेचे महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मोरे विद्यालय परिसरात मोहोळ यांची प्रचारफेरी काढण्यात आली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ, शहराध्यक्ष दीपक मानकर, मंजुश्री खर्डेकर, दीपक पोटे, जयंत भावे, अॅड. वर्षा डहाळे, पुनित जोशी, डॉ. संदीप बुटाला, अनुराधा येडके, अपर्णा लोणारे, कुलदीप सावळेकर, मिताली सावळेकर, शंतनू खिलारे पाटील, विठ्ठल बराटे, हर्षवर्धन मानकर, दीपक पवार, सचिन थोरात आदींचा प्रमुख सहभाग होता.

मोहोळ म्हणाले, ‘‘मुळा-मुठा पुनर्जीवन प्रकल्पात ११ नवीन अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ५५ किलोमीटर लांबीच्या नव्या सांडपाणी वाहिन्या आणि दररोजची सांडपाणी प्रक्रिया क्षमता ३९६ दशलक्ष मीटरने एमएलडीने वाढणार आहे.

Murlidhar Mohol
Pune Lok Sabha: पुणे, शिरूरच्या मविआ अन् महायुतीच्या उमेदवारांना नोटिसा; काय आहे कारण?

या प्रकल्पाशिवाय ५०० कोटी रुपये खर्च करून जुन्या दहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे अत्याधुनिकरण सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत ११ पैकी दहा प्रकल्पांचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.