Yerawada Jail: वर्तणूक चांगली म्हणून भरवसा ठेवला अन्.. येरवडा जेलमधून पळाला खुनाच्या गुन्ह्यातील कैदी

Yerwada Open Prison Escape Murder Convict On the run आत्माराम ऊर्फ आत्म्या लाडक्या भवर (वय ३४) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे.
yerawada Jail Break
yerawada Jail Breakesakal
Updated on

पुणे, ता. १५ : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने येरवडा येथील खुल्या कारागृहातून पलायन केल्याची घटना समोर आली आहे. येरवडा पोलिस या पसार झालेल्या कैद्याचा शोध घेत आहेत.

आत्माराम ऊर्फ आत्म्या लाडक्या भवर (वय ३४) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. भवर हा मूळचा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील देवीपाडा येथील रहिवासी आहे. त्याने २००९ मध्ये देवीपाडा गावात एकाचा खून केला होता. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपी भवरला १० जुलै २०१२ रोजी जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

yerawada Jail Break
Yerwada Jail : येरवडा कारागृहातून पळून गेलेला कैदी स्वत:हून हजर

भवरची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. त्याची वर्तणूक चांगली असल्यामुळे कारागृह प्रशासनाने त्याची खुल्या कारागृहात रवानगी केली होती. कारागृहातील पोलिस कर्मचारी तौसिफ सय्यद यांनी शनिवारी सायंकाळी कैद्यांची हजेरी घेतली. त्यावेळी भवर आढळून आला नाही.

कारागृह पोलिसांनी त्याचा खुल्या कारागृहात शोध घेतला. त्यानंतर कारागृह अधिकारी हेमंत पाटील यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भवर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

yerawada Jail Break
Yerwada Prison Break : असा पळाला येरवडा जेलमधून कैदी, खुल्या कारागृहाचा घेतला होता फायदा..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.