मटणाच्या पार्टीला न बोलावल्याचा रागातून झालेल्या भांडणातून एकाचा खून

मटणाच्या पार्टीसाठी जेवायला न बोलवल्याच्या कारणावरून गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास भांडण झाले.
murder
murdersakal
Updated on
Summary

मटणाच्या पार्टीसाठी जेवायला न बोलवल्याच्या कारणावरून गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास भांडण झाले.

मंचर - मटणाच्या पार्टीसाठी जेवायला न बोलवल्याच्या कारणावरून गुरुवारी (ता. २३) रात्री नऊच्या सुमारास गंगुबाई शिवाजी जवरे व मुलगा ओंकार जवरे (वय १३) यांच्या बरोबर भांडण झाले. भांडणाचा जाब विचारल्याच्या कारणावरून चिडून जावून तुकाराम बबन शिरसाठ (रा. टेंभुर्णी, ता. शिरूर कासार, जि. बीड) याने गंगुबाईचा मुलगा ओंकार जवरे व मजूर अर्जुन कुशाबा घोलप (मुळ रा. कान्हूर मेसाई, ता. शिरूर) या दोघानाही लाकडी दाडक्याने मारहाण केली. त्यामध्ये घोलप यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मंचर पोलिसांनी तुकाराम शिरसाठ याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी शिरसाठ पळून गेला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत संजय गणपत तारू (वय ५१, रा. वडगाव काशिंबेग, ता. आंबेगाव) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. तारू हे महात्मा गांधी विदयालय मंचर येथे शिपाई म्हणून काम करतात. विद्यालयाच्या शेजारीच असलेल्या खोल्यामध्ये मजूर अर्जुन घोलप राहत होता. त्याच्या शेजारी असलेल्या खोलीत गंगुबाई जवरे कुटुंबासह राहतात. तेथेच झोपडीत तुकाराम शिरसाठ हा कुटुंबासह राहत होता. तारू हे रात्री गस्त घालत होते. जवळ असलेल्या खोल्यामध्ये तुकाराम शिरसाठ आला.

गंगुबाई यांना म्हणाला, 'मटनाचे जेवन बनवले होते मग मला का जेवायला बोलावले नाही?' या कारणावरून कडाक्याचे भांडण सुरु होते. ओंकारला तुकाराम शिरसाठने कौल फेकुन मारले. त्यामुळे त्याला त्याची आई गंगुबाई दवाखान्यात घेवून गेली. या प्रकारनंतर अर्जुन घोलप तेथे आले ते म्हणाले 'तुकाराम तु नेहमीच भांडणे का करतो?' जाब विचारल्याचा राग आल्याने शिरसाठने लाकडी दांडक्याने घोलप यांच्या डोक्यात, तोंडावर, पाठीत मारहाण केली. नातेवाईकांनी घोलप यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण उपचारापूर्वीच घोलप यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी भेट दिली. पळून गेलेल्या आरोपी शिरसाठला सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर व पोलीस पथकांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.