पुणे : कोरोनामुळे सामूहिक नमाज पठन आणि कुरबानीचे वाटप करताना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा मुस्लिम बांधवांनी प्राण्यांची कुर्बानी न देता रक्तदान करावे, तसेच कोरोना उपचारासाठी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केले आहे.
पुण्यात १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पर्वती पायथा येथील साने गुरुजी स्मारक येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. यावर्षी १ ऑगस्ट रोजी 'बकरी ईद' साजरी केली जाणार आहे. ईदच्या दिवशी ईदगाह किंवा मशीदमध्ये सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यात येतं. श्रद्धेचा भाग म्हणून बोकड किंवा अन्य प्राण्यांची कुर्बानी दिली जाते.
कोरोनामुळे मानवासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी शासन-प्रशासन प्रयत्न करीत आहेत. या संकटकाळात मुस्लीम समाजाने सामूहिक नमाज पठण केल्यास तसेच कुर्बानीचे वाटप केल्यास कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू शकतो. त्यामुळे जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन रक्ताचे नाते निर्माण करण्यासाठी रक्तदान करावे. ज्यांनी कोरोनावर मात केली आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. शमसुद्दीन तांबोळी यांनी केले आहे.
"गेल्या १० वर्षापासून आम्ही बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करतो. यंदा पुण्यासह राज्यातील जिल्ह्यांमध्ये १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान हे रक्तदान शिबिराचे अभियान राबवण्यात येणार आहे. ज्यांना रक्तदान करणे शक्य नाही, त्यांनी इतर पद्धतीने वस्तू आणि र्थिक स्वरूपात मदत करावी. संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपये मदत दिली जाणार आहे."
- डॉ. शमसुद्दीन तांबोळी, अध्यक्ष, मुस्लीम सत्यशोधक मडंळ
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.