वाट्यावरचं मटन..पाट्यावर वाटण..चुलीवरची भाकर आणि आखाडाला जोर

कोरोना निर्बंधामुळे हॉटेल व्यवसाय बंद व ग्रामीण तिखट जेवणाला आणखीनच जोर चढला
champaran matan
champaran matansakal
Updated on

सासवड : ऊन-पावसाचा खेळ आणि झणझणीत मांस मटन चुलीवरच्या भाकरी देणाऱ्या आखाड पार्ट्यांचे थोडेच दिवस शिल्लक राहिल्याने..पुरंदर तालुक्यातील (Purandar) शहरी आणि ग्रामीण भागात जेवत्रणावळ्यांनी जोर पकडला आहे. यातील विशेष म्हणजे मटणाच्या (meat on home) वाट्याल्या (भागी) आणि पाट्यावरच्या वाटणाला चुलीवरच्या भाकरी आणि शेत शिवार मळ्याच्या सानिध्यात रुचकर जेवण याकडे साऱ्यांचा ओढा आहे. कोरोना (CORONA) निर्बंधामुळे हॉटेल व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे तर ग्रामीण भागातील या तिखट जेवणाला आणखीनच जोर चढला आहे.

पुरंदर तालुक्यात तालुक्याचे ठिकाण म्हणून सासवड पाठोपाठ जेजुरी ते निरा आधी निवडक ठिकाणीच मटणाची दुकाने पूर्वी होती. बाकी शंभरेक गावात खेडेगावात अशी दुकाने पूर्वी नसल्याने समूहाने बोकड किंवा मेंढी घेऊन ती कापून त्याचे सर्व भाग येतील, असे वाटे (भागी) तयार करणे आणि सहभागी लाभार्थ्यांना वाटायचे यालाच वाट्यावरचं किंवा भागीचं मटन किंवा मटणाचा वाटा म्हणतात. हे मटण सगळे पार्ट आल्याने व ती एकत्रित आल्याने एकदम गावरान पद्धतीने झकास चवीचे बनते. त्यामुळे आता मटणाची चिकनची किंवा माशांची दुकाने वाढली असली तरी वाट्यावरचं मटन घेण्यासाठी अनेकजण वाट पाहत असतात. त्यातूनच सरत्या आखाडाच्या जेवणावळ्या रंगू लागल्या आहेत.

गाव पातळीवर किंवा मित्रमंडळींच्यात सामूहिक पद्धतीने वाट्यावरचं मटण घेतलं तर व्यवसायिक दुकानावर पेक्षा ते स्वस्त पडतं ते संमिश्र असल्याने अगदी जागरण गोंधळात किंवा जत्रेत केलेल्या मटणाची चव यातही उतरते.

त्यामुळे याही आखाडात वाट्यावरचं मटन संघटन पद्धती टिकून आहे. शहरी भागामध्ये मात्र मटन, चिकन शॉप, मासोळी केंद्रे बरीच वाढल्याने घरगुती खरेदी तिथेच बऱ्यापैकी होते. ज्यांना शक्य आहे ते वाट्यावरचं मटन आणण्याची संधी मिळाल्यावर सोडत नाहीत. कोरोना निर्बंधामुळे हॉटेल व्यवसाय बंद आहे त्यामुळे तर ग्रामीण भागातील जीवनावर यांना आणखीनच जोर चढला आहे.

champaran matan
बारावीत शिकणाऱ्या नॅशनल हॉर्स रायडरची आत्महत्या

आमचं भिवडी तालुका पुरंदर या गावात आज पाच बकरी पडली. वाट्यावरचे मटण पाट्यावर वाटण चुलीवरची भाकरी म्हणून घराघरातून सुटणारा खमंग वास हे आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे. देवाचे वार सोडून रोज आठ ते दहा बकरी पडतील. भागीच्या मटनाला जागरण गोंधळ व जत्रेप्रमाणे स्वाद येतो.

-शहाजी आबा गायकवाड, माजी सदस्य जि.प. पुणे व संचालक, जगदंब मच्छी हाऊस, सासवड

बोकडाचे व बोलाई मटण सातशे रुपये किलोच्या दरम्यान आहे. गावरान कोंबडा सहाशे रुपये, गावरान कोंबडी चारशे रुपये. सेमी कोंबडी 250 रुपये किलो, मासे 100 ते 1000 रुपये किलो असा दर आहे. सध्या दर तेजीत आहेत.

-अरबाज बागवान, चिकन मटण विक्रेता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()