पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे

nonveg rate mutton price pune
nonveg rate mutton price pune
Updated on

मार्केट यार्ड :  बर्ड फ्लूमुळे ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. चिकनच्या मागणीत साधारणतः ३० टक्क्यांनी घट झाली आहे. तर मटण, मासळीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत बकरे, मेंढ्या उपलब्ध होत नसल्याने मटण विक्रेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे. तसेच यामध्ये २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. पुणे शहरात सध्या एक किलो मटणाची विक्री ६६० ते ६८० रुपये दराने केली जात आहे. वर्षभरात मटणाच्या दरात साधारणतः १०० रुपयांची वाढ झाली आहे.

पौष महिन्यात पश्चिम महाराष्ट्रातील गावोगावी वार्षिक यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे मटणाला चांगली मागणी आहे. बर्ड फ्लूमुळे चिकनच्या मागणीत मोठी घट झाली असून ग्राहकांकडून मटणाला मागणी आहे. अचानक मटणाच्या मागणीत वाढ झाल्याने मेंढी, बकऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच गावोगावी भरणाऱ्या बाजारातून होणारी मेंढी, बकऱ्यांची आवक कमी आहे. दहा किलोच्या एका मेंढी, बकऱ्यांसाठी मेंढपाळांना सात हजार रुपये मोजावे लागत आहेत.

सांगली, कोल्हापुरात मटणाला मागणी वाढली असली तरी दर स्थिर आहेत. अवेळी झालेल्या पावसामुळे ओला चारा खाणाऱ्या शेळी, मेंढ्याच्या वाढीवर परिणाम झाला आहे. बकरे, मेंढीच्या वाढीसाठी साधारणपणे अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. साधारणपणे तीन ते साडेतीन महिन्यांनतर एका बकऱ्याचे वजन दहा किलोपर्यंत भरते. मेंढ्याचे संगोपन करणे तसे जिकिरीचे आहे. नैसर्गिक अधिवासात त्यांची वाढ होते.

मेंढपाळ गावोगावी फिरतात. यंदाच्या वर्षी अवकाळी पाऊस झाल्याने मेंढ्यांच्या गर्भधारणेवर परिणाम झाला. ढगाळ वातावरणात मेंढ्या आजारी पडतात. या कालावधीत त्या पाणीही पित नाहीत. त्यामुळे मेंढी, बकऱ्यांच्या वाढीवर परिणाम होतो, असे पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रा जत्रांमुळे वाढलेली मागणी, बर्ड फ्लूच्या धोक्याने चिकनच्या मागणीत झालेली घट, चमड्याच्या व्यापारातून होणारा तोटा आणि अवकाळी पावसामुळे खुंटलेली बकऱ्यांची वाढ या तीन प्रमुख कारणांमुळे मटणाच्या दरा वाढ झाल्याचे दिसत आहे. 

कोठून येतात बकरी? 
पुणे जिल्ह्यात चाकण येथील बाजारात मालेगाव, बीड, कोपरगाव, औरंगाबाद येथून मेंढी, बकरे विक्रीस पाठविले जातात. शिरूर तालुक्यातील घोडनदी, यवत, तळेगाव ढमढेरे, अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथे बाजार भरतात. तेथे मेंढपाळ मेंढी, बकरे विक्रीस पाठवितात.

बकऱ्यांच्या वाढीवर परिणाम
अवेळी झालेल्या पावसामुळे ओला चारा खाणाऱ्या शेळी, मेंढ्यांच्या वाढीवर परिणाम झाला. ओला चाऱ्यामुळे त्यांचे वजन वाढले नाही. थंडीत बकऱ्यांना सुका चारा दिला जातो. साधारण संक्रांतीनंतर नवीन बकरे बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येतात. मागणी आणि पुरवठा याचा समतोल बिघडला आहे. घाटावरील मेंढपाळ कोकणात बकºया घेऊन जातात. नैसर्गिक वातावरणात बकऱ्यांची वाढ उत्तम होते. यंदा अवेळी झालेल्या पावसामुळे बकऱ्यांच्या वाढीवर परिणाम झाला असल्याचे मटण विक्रेत्यांनी सांगितले.

मटणाचे दर (किलोमागे रुपयांत)
जानेवारी २०२० - ५८० ते ६०० 
जानेवारी २०२१ - ६६० ते ६८०

मद्रास येथील वानमवडी आणि त्या परिसरात चामडी टॅनरिजमध्ये पाठविली जात होती. परंतु चीन, युरोप, रशिया येथील चामाडीची ८० टक्क्यांनी मागणी घटली आहे. चामडीला पर्याय फॅब्रिक्स आले आहे. जाळल्या नंतरच ते काय आहे हे कळते. त्यामुळे प्रतवारीनुसार १०० ते २५० रुपयांपर्यंत विकले जाणारे कातडे ७०-८० रुपयांना विकले जात आहे. त्यातून होणारा तोटा मटनामधून भरून काढला जातो.
- प्रभाकर कांबळे, अध्यक्ष, पुणे शहर मटण दुकानदार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.