MVA Seat Sharing Pune: महाविकास आघाडीत रस्सीखेच, पुण्यात काँग्रेसने 'या' मतदारसंघांवर ठोकला दावा

Pune Congress: सध्या पुण्यातील 8 जागांवर सर्वाधिक 5 जागांवर भाजपचे आमदार आहेत. त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची 2 आमदार आहेत. तर काँग्रेसचा 1 आमदार आहे.
MVA Seat Sharing Pune Congress
MVA Seat Sharing Pune CongressEsakal
Updated on

राज्यातल पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमिवर सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात पुणे काँग्रेसने शहरातील 5 विधानसभा मतदारसंघांचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला असल्याचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.

दरम्यान पुण्यातील 8 काँग्रेस नेत्यांनी आतापर्यंत पक्षाकडे उमेदवारी मागणीसाठी अर्ज केला असून, काँग्रेसने दावा ठोकलेल्या जागांमध्ये कसबा पेठ, पुणे कॅन्टोनमेंट, शिवाजी नगर, हडपसर आणि पर्वती या मतदासंघांचा समावेश आहे.

सध्या पुण्यातील 8 जागांवर सर्वाधिक 5 जागांवर भाजपचे आमदार आहेत. त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची 2 आमदार आहेत. तर काँग्रेसचा 1 आमदार आहे.

महाविकास आघाडीत रस्सीखेच

काँग्रेसच्या या मागणीमुळे महाविकास आघाडीतील शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना कशी प्रतिक्रिया हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण सध्या हडपसर, वडगाव शेरी, पर्वती या मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील अनेकजन उत्सुक आहेत. तर ठाकरे यांची शिवसेना कोथरूड आणि खडकवासला मतदारसंघातून लढण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे जागावाटपात काय निर्णय होणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

MVA Seat Sharing Pune Congress
Earthquake: राज्यात झालेल्या भूकंपाचा हा तालुका आहे केंद्रबिंदू, मोठी अपडेट आली समोर

महायुतीतही चढाओढ

विधानसभा निवडणुकीत आपल्या पारड्यात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी महायुतीमध्येही चढोओढ लागली आहे. असे असले तरी सध्या सर्वाधिक आमदार असलेला भाजपच महायुतीतून सर्वाधिक जागा लढवणार हे निश्चित असले तरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादीही प्रत्येकी 100 जागांची मागणी करत आहे. यासाठी त्या त्या पक्षाचे नेते दावे प्रतिदावे करत आहेत.

MVA Seat Sharing Pune Congress
Vidhan Parishad Election : ‘मविआ’च्या बैठका; महायुतीलाही विजयाचा विश्वास

लोकसभेत महायुतीला दणका

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत महायुतीला जोरदार दणका दिला. यामध्ये राज्यात काँग्रेसने सर्वाधिक 13 जागांवर विजय मिळवला तर ठाकरेंच्या शिवसेनेने 9 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 8 जागांवर विजय मिळवला.

महायुतीत भाजपच्या वाट्याला 9, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रावादी 1 जागा मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.