माळेगाव : माळेगाव (ता.बारामती) नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूकीच्या निमित्ताने आज झालेल्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीमध्ये बहुतांशी इच्छुक उमेदवारांची राजकिय समिकरणे बदल्याचे स्पष्ट झाले. दिपक तावरे, अशोक सस्ते आदी प्रमुख इच्छुकांना इतर प्रभागात आपले नशिब आजमावे लागणार आहे. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या अधिपत्याखाली अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती (या अगोदर सोडत झाली आहे) असे दोन प्रभाग वगळता १५ प्रभागामधील आरक्षण सोडत पार पडली. त्यामध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या कृती आराखरड्यानुसार एक सदस्यीय प्रभागाची अंमलबजावणी होताना दिसून आली. यामध्ये ८ पुरुष व ९ महिला असे एकूण १७ जणांना नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.
सोमवारी जाहीर झालेली आरक्षण सोडत व या आगोदर जाहिर झालेली प्रभाग रचना मनासाखरी झाली नसल्याने बहुतांशी इच्छुक उमेदवारांचे मनसुबे धुळीला मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेषतः माळेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण याआगोदरच जाहिर झाले असून अनुसुचित जाती महिलेसाठी हे पद निश्चित झाले आहे. दरम्यान, प्रभागनिहाय आरक्षण सोडत, कंसात लोखसंख्या व प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा पुढील प्रमाणे ः
प्रभाग १ ः सर्वसाधारण महिला (१३१०) रचना- उत्तर दगडी खाण, पुर्व सलोबाचा ओढा, दक्षिण नंदन डेअरी-पाणी फिल्चर रस्ता, पश्चिम पणदरे व सोनकसवाडी ग्रामपंचायत हद्द.
प्रभाग २ः सर्वसाधारण महिला (१३३०) रचना- उत्तर खूंटाळेवस्ती, पुर्व जाधवराव राजवाडा रोड, दक्षिण क्रीडा संकूल संरक्षण भिंत, प्रश्चिम मुथा पेट्रोल पंप.
प्रभाग ३ः सर्वसाधारण महिला (१२८२) , रचना- उत्तर माळेगाव खुर्द हद्द ओढा, पुर्व निरा-बारामती रोड स्मशानभूमी, दक्षिण एसएसएम हायस्कूल मागिल बाजू, पश्चिम क्रीडा संकूल कंपाऊंड.
प्रभाग ४ ः सर्वसाधारण (१११२) , रचना- नीरा बारामती रोड, पुर्व झैलसिंग रोड, दक्षिण दत्त चौक-पालखी मार्ग, पश्चिम मेनपेठ रोड.
प्रभाग ५ः सर्वसाधारण महिला (१३६८), रचना- उत्तर एसएसएम हायस्कूल, पुर्व माधवानंद टाॅकीज समोरून जाणारा रस्ता, दक्षिण न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल, प्रश्चिम प्राथमिक आरोग्य केंद्र.
प्रभाग ६ ः अनुसुचित जाती (१२५०), रचना- उत्तर दत्त चौक पालखी मार्ग, पुर्व झेलसिंग रोड, दक्षिण २२ फटा, पश्चिम न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल.
प्रभाग ७ ः अनुसुचित जाती महिला (१२००), रचना- उत्तर हरिभाऊ तावरे वस्ती, पुर्व एरिगेशन चारी, दक्षिण संभाजीनगर गायकवाड वस्ती रस्ता, पश्चिम पिर दर्गा.
प्रभाग ८ ः सर्वसाधारण महिला (११२५), रचना-उत्तर नीरा-बारामती रोड, पुर्व बारामती-माळेगाव शिव,दक्षिण लाखे गोठा, पश्चिम झैलसिंग रोड.
प्रभाग ९ ः सर्वसाधारण महिला (११२९), रचना- उत्तर संभाजीनगर गायकवाड वस्ती रस्ता, पुर्व शारदानगर आंदोबावाडी रोड, दक्षिण पाहुणेवाडी रस्ता, पश्चिम शिरवली रोड.
प्रभाग १०ः सर्वसाधारण (११९०),रचना- उत्तर न्यू इंग्लिश मेडीय़म स्कूल, पुर्व २२ फाटा, दक्षिण-शारदाबाई पवार विद्यालय, पश्चिम एरिगेशन चारी.
प्रभाग ११ः सर्वसाधारण (१२०५), रचना- उत्तर नंदन डेअरी, पुर्व-दफण भूमी, दक्षिण २२ फाटा, पश्चिम नागतळे.
प्रभाग १२ ः सर्वसाधारण (१३५३), रचना-उत्तर दगडी खाण, पुर्व इंजिनिअरिंग काॅलेज शेजारील खाणीकडे जाणारा रस्ता, दक्षिण रमा माता नगर, पश्चिम पणदरे-माळेगाव रस्ता.
प्रभाग १३ः सर्वसाधारण (१२५०), रचना- उत्तर रमामाता नगर, पुर्व नागतळे, दक्षिण गोफणेवस्ती, पश्चिम पणदरे माळेगाव शिव.
प्रभाग १४ः सर्वसाधारण महिला (१३५०), रचना- उत्तर २२ फाटा, पुर्व माळेगाव शिरवली रोड, दक्षिण बर्गे हाॅस्पीलट ते तावरेवस्ती रस्ता, पश्चिम लोणकरवस्ती.
प्रभाग १५ ः सर्वसाधारण ( १२८६), रचना-उत्तर बर्गे हाॅस्पीटल ते तावरेवस्ती रस्ता, पुर्व २२ फटा, दक्षिण-बुरूंगलेवस्ती प्राथमिक शाळा, प्रश्चिम माळेगाव शिरवली रोड.
प्रभाग १६ः सर्वसाधारण (१३२०), रचना- उत्तर वाघमोडे कोळेकरवस्ती रस्ता, पुर्व येळेवस्ती रस्ता, दक्षिण येळे वस्ती, पश्चिम नाळे-नलवडेवस्ती.
प्रभाग १७ः सर्वसाधारण महिला (१३९७), रचना-उत्तर गोफणेवस्ती, पुर्व माळेगाव शिरवली रोड, दक्षिण शिरवली शिव, पश्चिम धुमाळवाडी शिव.
हारकतीचा कालावधी
माळेगाव नगरपंचायतीची लोकसंख्या २१ हजार २८४ इतकी आहे. त्यानुसार या नगरपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने जाहिर झालेल्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीबाबत हारकती व सूचनांसाठी मंगळवार (ता. २१ जून ) पर्यंत कालावधी दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.