Nagraj Manjule : महापुरुषांच्या विचारांमुळे जातीचा प्रादुर्भाव कमी; दिग्दर्शक नागराज मंजुळे

पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना कलाविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Mumbai
Mumbaisakal
Updated on

जुनी सांगवी - महापुरुषांच्या विचारांमुळेच समाजात जातीचा प्रादुर्भाव कमी झाला. गावपातळीवर जातीवरुन कसे हिणवतात हेच चित्र फॅंड्री मधून जब्याच्या माध्यमातून जनतेसमोर मांडले.जब्या काही अंशी माझ्यात ही आहे.

जब्याचे जीवन मीही अनुभवले आहे. मात्र महापुरुषांच्या विचारांमुळे जात नावाच्या विचित्र रोगाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहेत. असे नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मत व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशनच्या वतीने मंजुळे यांना रोख रक्कम ५१ हजार,सन्मान चिन्ह देऊन कलाविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .या दरम्यान फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी मंजुळे यांची प्रकट मुलाखत घेतली.

कार्यक्रमास आमदार अश्विनी जगताप, माजी आमदार विलास लांडे,माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे,नाना काटे, निर्मला कुटे,उद्योजक वसंत काटे,सतीश इंगळे,बापू पवार,उद्योजक संजय भिसे,जगन्नाथ काटे,सुरेश काटे,डॉ अमरसिंग निकम,लेखिका अनिता भिसे,कुंदा भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

Mumbai
Mumbai : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसंदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सर्वेक्षणही...

आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या , मंजुळे यांनी सैराट मधून पळून गेलेले प्रेम युगुलांमुळे घरातील झालेली घालमेल आणि ऑनर किलिंगचा प्रश्न मांडला.मागासवर्गीय जातीचा म्हणून ग्रामीण भागातून होणारा अपमान थांबला पाहिजे.यावर सर्वांनी आवाज उठवला तर जातीचा ज्वलंत प्रश्न नष्ट होईल.

प्रास्ताविकात विजय भिसे म्हणाले, शहराचा सर्व क्षेत्रात विकास झालेला आहे.मात्र शहरातील कला संस्कृतीचा अधिक विकास व्हावा या हेतूने सांस्कृतिक उपक्रम राबवत आहोत. सांस्कृतिक अस्मिता जपण्यासाठी पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत.संतोष घुले यांनी मंजुळे यांच्या परिचय पत्राचे वाचन केले.

सर्व महापुरुषांनी सर्व जातीधर्मातील नागरीकांसाठी समाज परिवर्तन करण्याचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासह अनेक महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपले गुरू मानले.

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे केवळ एका जातीचा उद्धार झाला नाही तर अठरापगड जातींसह संपूर्ण महाराष्ट्राचा उद्धार झाला. मराठी संस्कृतीचा विकास झाला. दिग्दर्शक नागराज मंजुळे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता जोगळेकर यांनी तर आभार शिल्पा बिडकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.