गायकवाडच्या घरात सापडले एअर रायफल, काडतुसे, नोटा मोजण्याच्या मशिन

खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंध येथील गायकवाड कुटुंबीयांच्या घराची पोलिसांनी नुकतीच घरझडती घेतली.
Crime
CrimeSakal
Updated on

पुणे - ईएसए मॉडेल २०० एअर रायफल, (Air Rifle) ३१ जीवंत काडतुसे (Bullet) असलेले ३२ कॅलीबरचे दोन बॉक्स, नोटा मोजण्याचे दोन मशिन, (Currency Counting machine) नानासाहेब गायकवाड यांनी संजीव मोरे व इतर ७० लोकांकडून घेतलेले विना सह्यांचे खरेदीखत औंध येथील त्यांच्या घरात मिळून आले आहे. तसेच पोलिसांना दोन पानी कागद मिळाला असून त्यावर १४ लोकांची नावे आहेत. नावांच्या पुढे त्यांना कर्जाने दिलेली रक्कम लिहिण्यात आली आहे.

खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंध येथील गायकवाड कुटुंबीयांच्या घराची पोलिसांनी नुकतीच घरझडती घेतली. त्यात हा सर्वे मुद्देमाल पोलिसांना सापडला आहे. पोलिसांना या प्रकरणी अटकेत असलेल्या नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (वय ७०), नंदा नानासाहेब गायकवाड (वय ६५) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध) यांना पोलिस कोठडीत तीन सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.

Crime
संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी पुण्यात दिले नव्या वादंगाला आमंत्रण !

गायकवाड त्यांच्या घरातील सीसीटीव्हीचे संच बंद असून उपलब्ध असलेल्या डीव्हीआर तसेच तेथील इतर ईलेक्ट्रानिक साधनांमध्ये छेडछाड केल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक कागदपत्रे फाईल्समधून काढून घेण्यात आले आहे.

नानासाहेब गायकवाड यांच्या बेडरुमध्ये पैसे मोजण्याची एक मशिन मिळून आली आहे, अशी माहिती सरकारी वकील विजय फरगडे यांनी शुक्रवारी (ता. २७) न्यायालयास दिली. मुळ फिर्यादीतर्फे ॲड. पुष्कर दुर्गे, ॲड. सचिन झालटे, ॲड. ऋषिकेश धुमाळ कामकाज पाहत आहे. सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

पोलिस तपासातील मुद्दे :

- नंदा गायकवाड हीने साथीदारांच्या मदतीने गुन्ह्याच्या संदर्भातील महत्त्वाचे कागदपत्र व पुरावे इतर ठिकाणी हलविले

- वडगाव बुद्रूक येथील फ्लॅटमध्ये मिळालेल्या डाय-यांमधील पाने नंदा यांनी फाडले

- नानासाहेब गायकवाड हे नेहमी रिव्हॉल्वर सोबत ठेवत

- गणेश गायकवाड हा तो वापरत असलेले मोबाईल मुंबई येथे विसरला असल्याचे सांगत आहे

- साक्षीदाराचे लॉकर उघडून त्यांची चावी आरोपींना स्वतःकडे ठेवली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.